अयोध्येतील भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी

केंद्र सरकारचा निर्णय

अयोध्येतील भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये श्री राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने अयोध्येत तीर्थक्षेत्र ट्रस्ट, केंद्र आणि योगी सरकारकडून सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण देशातही राममय वातावरण झाले आहे. अशातच या भुतोनभविष्यती अशा सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने संपूर्ण देशातील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेता, केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जात आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, “अयोध्येतील श्री राम मंदिरात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या सोहळ्यात सामील होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येत आहे. त्यानुसार, २२ जानेवारीला देशातील केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था, केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस अर्थात दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद असतील.”

हे ही वाचा:

पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणवर पुन्हा दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानला पराभूत करून रोहित शर्माने मिळवले मोठे यश

अयोध्येला एटीएस कमांडोचे सुरक्षा कडे

जया शेट्टींनी कबड्डीचीच नव्हे तर अनेक खेळांची केली सेवा!

प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा २२ जानेवारीला दुपारी १२.२० वाजता सुरू होईल आणि दुपारी एक वाजता संपेल. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सध्या या सोहळ्याची तयारी सुरू असून एका बाजूला निमंत्रण पत्रिकांचे वाटपही सुरू आहे. सुमारे आठ हजार निमंत्रित उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. यावेळी नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

Exit mobile version