गुलाम नबी आझाद म्हणतात, माझे पूर्वजही काश्मिरी पंडित होते!

गुलाम नबी आझाद म्हणतात, माझे पूर्वजही काश्मिरी पंडित होते!

द काश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार, अन्याय, त्यांना त्यांच्या भूमीतून हुसकावून लावण्यात आल्याच्या वेदना याविषयी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादही या वातावरणामुळे व्यक्त झाले आहेत. त्यांनी केलेले विधान खळबळजनक आहेच पण विचार करायला भाग पाडणारेही आहे.

एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आझाद म्हणतात की, काश्मीरमध्ये दहशतवादामुळे प्रचंड नुकसान झाले याचा इन्कार करता येणार नाही, काश्मिरी पंडित मारले गेले, त्यांची आयुष्य उद्ध्वस्त झाली याचाही कुणी इन्कार करू शकत नाही. मी जेव्हा यासंदर्भात संसदेत चर्चा झाली त्या त्या वेळी हा मुद्दा उपस्थित केला आहे की, काश्मिरी पंडितांशिवाय काश्मीर अपूर्ण आहे. कारण जे मूळ काश्मिरी मुस्लिम आहेत हे सगळे धर्मांतरित झालेले मुस्लिम आहेत. काश्मिरी पंडीत असलेले हे लोक पुढे धर्मांतरित झाले. ६०० वर्षांपूर्वी माझे पूर्वजही काश्मिरी पंडित होते. मी हे संसदेतही हे सांगेन. काहीजणांना हे सांगताना लाजही वाटेल पण इतिहास तर तोच आहे.

हे ही वाचा:

…आणि पंतप्रधान मोदींनी केली चित्रकार आयुषची इच्छा पूर्ण

वानखेडे स्टेडियम, हॉटेलची अतिरेक्यांकडून रेकी नाही!

कवितांच्या माध्यमातून ठाकरे सरकारचे वाभाडे! देवेंद्र फडणवीसांचा अनोखा अंदाज

योगी आदित्यनाथ घेणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

 

गुलाम नबी आझाद यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे आणि त्यांचे म्हणणे योग्यच असल्याचीही भावना व्यक्त होत आहे.

आझाद हे सध्या चर्चेत आहेत ते जी २३ या काँग्रेसमधील जुन्याजाणत्या नेत्यांच्या गटामुळे. या गटातील ते एक प्रमुख सदस्य आहेत. या गटाकडून काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान दिले जाते आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही या गटाने गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडावे अशी मागणी केली होती.

Exit mobile version