गुजरातमधील सुरत येथील एका हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या मंदीरातील प्रभू रामांच्या मूर्तीसाठी ‘मुकुट’ दान केला आहे. प्रभू रामलल्ला साठी हा खास मुकुट तयार करण्यात आला असून याची किंमत तब्बल ११ कोटी रुपये इतकी आहे.
२२ जानेवारी रोजी प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.देशासह जगभराचे लक्ष या सोहळ्याकडे लागले होते.पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडला.प्रभू रामांच्या मूर्तीवर विविध सोने-हिरे,चांदीची आभूषणे घातली आहेत.देशासह जगभरातील भक्तांनी प्रभू रामांसाठी आप आपल्यापरीने देणगी दिली आहे. दरम्यान, सुरतच्या हिरे व्यापाऱ्याने श्री रामांसाठी सोनेरी मुकुट दान केला आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची तुलना प्रभू श्री रामांशी
मध्यप्रदेशातील कुनो पार्कमधील मादी ज्वाला चित्त्याने तीन शावकांना दिला जन्म!
एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा
शिकागोजवळ तीन ठिकाणी आठ जणांची गोळ्या झाडून हत्या
मुकेश पटेल असे देणगीदाराचे नाव असून ते सुरत येथील ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक आहेत.मुकेश पटेल यांनी भगवान रामलल्लासाठी सोने, हिरे आणि मौल्यवान रत्नांनी सजलेला ६ किलोग्रॅम वजनाचा मुकुट भेट दिला.या मुकुटाची किंमत ११ कोटी रुपये इतकी आहे.हिरे व्यापारी मुकेश पटेल हे ११ कोटी रुपयांचा मुकुट भेट देण्यासाठी रामलल्ला मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधी कुटुंबासह अयोध्येत पोहोचले होते. मुकेश पटेल यांनी हा मुकुट मंदिर ट्रस्ट आणि मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हवाली केला.
मुकुटात चार किलो सोन्याचा वापर
प्रभू रामललाच्या मूर्तीचे मुकुट मोजण्यासाठी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अयोध्येला पाठवण्यात आले होते. मूर्तीचे मोजमाप घेऊन कंपनीचे कर्मचारी सुरतला आले आणि त्यानंतर मुकुट बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. एकूण ६ किलो वजनाच्या या मुकुटात ४ किलो सोने वापरण्यात आले आहे. मुकुटात लहान-मोठ्या आकाराचे हिरे, माणिक, मोती, नीलम अशी रत्ने जडवली आहेत.सर्व साहित्य वापरून तयार केलेल्या मुकुटाचे रूप अयोध्येत रामचंद्रांच्या मस्तकावर ठेवण्यात आले आहे.