‘भारत एक सनातन यात्रा’ मधील कलाकृतींचे पाहुण्यांनी केले कौतुक!

‘भारत एक सनातन यात्रा’ मधील कलाकृतींचे पाहुण्यांनी केले कौतुक!

२१ ते २७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे युवा कलाकार ध्यान पासिका यांच्या समकालीन कलाकृतींवर आधारित ‘भारत: एक सनातन यात्रा’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कलाकृतींचे भरभरून कौतुक केले आहे.

दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, पेंट आणि ब्रशच्या माध्यमातून सनातन भारताची सुंदर व्याख्या कॅनव्हासवर करण्यात आली आहे. ध्यान पासिका आपल्या कलाकृतींद्वारे अभ्यागतांना सुवर्ण भारताच्या अनोख्या प्रवासात घेऊन जात आहे. ध्यान पासिकाच्या कलाकृती पाहिल्यानंतर सर्वच कलाकृती विलक्षण असल्याने कोणती कलाकृती उत्कृष्ट म्हणावी हे ठरवणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आजच्या तरुणांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचा विश्वास या कामगिरीद्वारे स्पष्ट होत आहे असेही ते म्हणाले आहेत.

या कार्यक्रमात पद्मश्री सन्मानित प्रख्यात चित्रपट निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक डॉ.चंद्र प्रकाश द्विवेदी, ओशो वर्ल्ड मॅगझिनचे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे महासंचालक प्रा. संजय द्विवेदी हेही उपस्थित होते.

यावेळी डॉ.चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी ध्यान पासिकाची संकल्पना विलक्षण असून चित्रकलेशिवाय कोणतेही घर अपूर्ण असते, असे म्हटले आहे. ज्या घरात पेंटिंग असते, ते घर पूर्ण होते. ओशो वर्ल्ड मॅगझिनचे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे महासंचालक प्रा. संजय द्विवेदी यांनीही कलाकृतींची प्रशंसा केली आहे.

हे ही वाचा:

रशिया-युक्रेन प्रश्न चर्चेतून सोडवावा

‘संजय राऊत यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली?’

शिवसेनेच्या वचननाम्यात मराठी भाषेसंदर्भात दिलेली वचने कधी पूर्ण करणार?

‘हिजाब वाद हा इस्लामिक स्टेटच्या दिशेने पहिले पाऊल आहे’

‘भारत एक सनातन यात्रा’ हे युवा कलाकार ध्यान पासिका यांच्या नव-आध्यात्मिक कलाकृतींचे प्रदर्शन करणारे अनोखे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ध्यान पासिकाने सुवर्ण भारताचे अनोखे रहस्य आपल्या कॅनव्हासवर कोरले आहे. भारताचे तेजस्वी देवत्व आणि शाश्वत ज्ञान परंपरा अधोरेखित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

Exit mobile version