राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….

राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….

राज्यभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजे आजपासूनच राज्यातील करोना संदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. तब्बल दोन वर्षांनी लोकांनी एकत्र येऊन कोणत्याही नियमांविना, मास्कविना हा हिंदू नव वर्षाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

शनिवार, २ एप्रिल सकाळपासूनच मुंबई, ठाणे, डोंबिवली, दादर, गिरगाव या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत होता. तरुणाईने एकत्र येऊन मोठ्या उत्सहात हा सण साजरा केला. डोंबिवलीमध्ये दोन वर्षांच्या अंतराने भव्य शोभा यात्रा आयोजित करण्यात आली होती. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनी स्वागतयात्रेतून संदेश दिला. “युद्ध नको, आम्हाला शांतता हवी” अशा आशयाचे फलक घेऊन काही डोंबिवलीकर सैन्याच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी या स्वागत यात्रेत सहभाग घेतला होता. यावेळी अमृता खानविलकर हिने ढोल ताशा पथकासोबत झांज वाजवण्याचा आनंद घेतला.

हे ही वाचा:

श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू

आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी

तुझे तेज अंगी शतांशी जरीही

गुढीपाडव्याला काय असतात विधी?

गिरगाव येथेही ढोल ताशे, लेझीम पथकाने स्वागत यात्रेत सहभाग घेतला होता. यात्रेमध्ये तरुण-तरुणी, नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. तसेच महिलांची बाईक रॅली देखील काढण्यात आली होती. हाच उत्साह भिवंडी, कल्याण, ठाणे आणि राज्यातील सर्वच शहरांमध्ये दिसून आला. राजकारण्यांनीही आपल्या कुटुंबांसोबत गुढीपाडव्याचा सण साजरा केला.

Exit mobile version