पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसला वेगळा आनंद

मंदिरात आता वर्षभर देता येणार मोफत सेवा

पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसला वेगळा आनंद

गेली अनेक वर्ष वारकरी भाविकांकडून विठ्ठल मंदिरात विनामूल्य सेवा देण्याची इच्छा व्यक्त करण्यांत येत होती ती इच्छा आता मंदिरातर्फे लवकरच पुरी केली जाणार आहे. त्यामुळे सर्व भाविक खुश झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपसून भाविक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विनामूल्य सेवा देण्याची इच्छा व्यक्त करत होते. आता मंदिर समितीचे कार्यकारि अधिकारी तुषार ठोंबरे यांनी या व्यवस्थेचे संकेत दिले असल्यामुळे आता वारकरी संप्रदाय आनंदी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे विनामूल्य देवाची सेवा करण्यास तयार असल्याची भावना भाविकांकडून होत आहे.

महाराष्ट्रातील शेगावच्या संत गजानन महाराज, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज आणि इतरही काही देवस्थानातून अशा प्रकारे मोफत सेवा देण्याची सोय आखलेली आहे. त्याचप्रमाणे आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांच्या प्रति सेवा भाव दाखवत भाविकांकडून सारखी मागणी करण्यांत येत होती. अशा पद्धतीची सेवा करण्यास अनेक भक्तगण उत्सुक असून यासाठी अनेक संस्थाही पुढाकार घेऊन ही सेवा करू इच्छित आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सध्या २७२ कर्मचारी आणि शेकडो हंगामी कर्मचाऱ्यांच्या मदतीने विठ्ठल मंदिरामध्ये प्रशासन सेवा देत आहेत. यामध्ये भाविकांकडून आलेला पैसा हा यामध्ये खर्च होऊन जातो.

एकीकडे हजारो विठ्ठलभक्त देवाला सेवा देण्यास तत्पर आहेत तर भाविकांच्या पैशांची उधळपट्टी का करावी असा सवाल होत आहे. म्हणूनच प्रशासन प्रायोगिक तत्वावर या मोफत विठ्ठल सेवा प्रकल्प राबवण्यात येणार असून, या प्रकल्पात वारकऱ्यांना या विठ्ठल भक्तांकडून चांगली वागणूक मिळेल. याशिवाय मंदिरात येणारा   भाविकांचा पैसा हा विकास कामासाठी वापरता येणार आहे.  मंदिराचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले कि, मंदिरात ३६५ दिवस आणि २४ तास या सेवा द्याव्या लागतात. यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. ज्या भाविकांना सेवा द्यायची आहे त्यांच्याकडून माहिती मागवण्यात येणार असून त्यांना सेवा, अटी, शर्ती आणि एकूण कालावधी ठरवून देण्यात येऊन या व्यवस्थेला सुरवात केली जाणार आहे.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्गावरून शक्तिपीठ महामार्गाकडे

किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’

आगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

हसत खेळत सतिश कौशिकची एक्झिट…

विठ्ठलभक्तांकवून आम्हाला मोफत राहण्याची व्यवस्था केल्यास आम्ही मोफत सेवेस  तयार  असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्य म्हणजे या प्रकारची सेवा देण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणांत उत्सुक असल्याची बाब समोर येत आहे. अशी सेवा सुरु झाल्यास खऱ्या अर्थाने विठ्ठल मंदिर भक्तांच्या ताब्यात येणार आहे. या निर्णयामुळे मंदिरात होणाऱ्या वादावर पडदा पडून मंदिराच्या कारभारामध्ये पारदर्शकता येणार आहे. विठ्ठल मंदिर, अन्नछत्र, दर्शन व्यवस्था, परिवार देवता अशा ठिकाणी मोफत सेवा वापरता येणार आहे.

Exit mobile version