मराठी माणसाला एकत्र येऊ द्यायचे नाही, म्हणूनच दहीहंडीला विरोध आहे का?

मराठी माणसाला एकत्र येऊ द्यायचे नाही, म्हणूनच दहीहंडीला विरोध आहे का?

विक्रमी थर लावणाऱ्या ‘जय जवान’ची खंत

कोरोनामुळे दहीहंडी उत्सव होणार नाही, असे राज्यातील ठाकरे सरकारने निश्चित केले आहे. पण दहीहंडी मंडळे मात्र खेळ व्हायला हवा, असे ठाम मत व्यक्त करत आहेत. सर्वाधिक थर लावणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान दहीहंडी मंडळाला सरकारची ही भूमिका पटत नाही. जय जवानच्या डेव्हिड फर्नांडिस यांनी यासंदर्भात सांगितले की, आयोजनाबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. पण सरकारची मोगलाई सुरू आहे. गेल्या वर्षी दहीहंडी झाली नाही. निदान यावर्षी तरी ती व्हायला हवी. आमच्या ४०-४२ टक्के मुलांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे त्यांना दहीहंडी खेळायला काही हरकत नाही. जवळपास आम्ही ४५०-५०० मुलं आम्ही सराव करतो आहोत. पण लस घेऊनही आम्हाला दहीहंडी खेळायला दिले जात नसेल तर मग लसी नकली आहेत किंवा सरकार तरी नकली आहे.

सराव, फिटनेस सुरूच होता. आम्हाला त्यात कोणताही त्रास झाला नाही. आर्थिक नुकसान होत आहे. पण दहीहंडी खेळल्यावर आम्हाला जे पैसे मिळत होते. त्यातून आम्ही सामाजिक कार्य वर्षभर करतो. कोरोना काळात आम्ही धान्यवाटप केले. महाडला जाऊन धान्यवाटप केले. अलिबागला जाऊन वादळातील पीडितांना दिलासा दिला. तिथे जाऊन पडलेली झाडे बाजूला करणे, ती कापून काढणे ही कामे आमच्या मुलांनी केली. आता दहीहंडी नसल्यामुळे आम्हाला तो आर्थिक फटका बसणार आहे. पण प्रत्येक सामाजिक कार्यात जय जवानचा नेहमीच पुढाकार असतो. आम्हाला जी बक्षिसे मिळतात तीही बंद झाली आहेत. सगळीकडून आमची कोंडी होते आहे. मराठी माणसाला एकत्र यायला हे सरकार देत नाही. बारमध्ये सोशल डिस्टन्सिंग असते का, बारमध्ये सॅनिटायझर, मास्क वापरतात का, या सगळ्या गोष्टी आहेत. बारमध्ये बाजुला बसून मद्यपान केले जाते. मग दहीहंडीलाच का विरोध?

हे ही वाचा:

महिलांनो शिक्षण घ्या, पण पुरुषांसोबत नाही!

भारताशी व्यापार करायला तालिबान उत्सुक

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची का केली ईडीने चौकशी? वाचा…

पुन्हा भालाफेकीत भारताला मिळाले सुवर्ण; सुमित अंतिलची जबरदस्त कामगिरी

आम्ही विनंती केली की, काही नियम करा आणि खेळू द्या, दोन लसी घेतल्या आहेत त्यांना खेळू द्या. गणपती विविध नियमांच्या आधारे होत आहे मग नियम, अटींच्या अधीन राहून आम्हाला खेळू द्या. त्या अटींचा भंग झाला तर कारवाई करा. पण दहीहंडी खेळूच नका हे सरकारचे धोरण संतापजनक आहे.

Exit mobile version