28 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरधर्म संस्कृतीगोव्यात भरणार वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

गोव्यात भरणार वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

१६ ते २२ जून या कालावधीत अधिवेशन होणार

Google News Follow

Related

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ अर्थात एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यंदा १६ ते २२ जून या कालावधीत श्री विद्याधिराज सभागृह, श्री रामनाथ देवस्थान, बांदोडा, फोंडा, गोवा येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी २५ राज्यांतून ३०० हून अधिक हिंदु संघटना संघटित झाल्या आहेत. या अधिवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश येथूनही संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, विचारवंत आदी मान्यवर सहभागी होतात.

आजही दरवर्षी लाखो हिंदूंची फसवणूक करून धर्मांतर केले जाते. काश्मिरसह देशभरात हिंदूंना वेचून मारले जात आहे. तर कधी लव्ह जिहादच्या नावाखाली श्रद्धाचे ३५ तुकडे केले जात आहेत. कला स्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपट, मालिका, वेब सीरिज, सोशल मीडियासारख्या माध्यमांतून हिंदू देव- देवतांची खिल्ली उडवली जात आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी ‘हलाल अर्थव्यवस्था’ उभी करून हिंदूंना हलाल खाद्यपदार्थ घेण्यास बाध्य केले जाते.

‘श्रीरामचरितमानस’ सारख्या ग्रंथाला बकवास म्हणत हिंदूंच्या धर्मग्रंथांचे दहन केले जाते, तर हिंदूंच्या मंदिरा आणि प्रथा-परंपरा यांना सातत्याने लक्ष्य केले जाते. यातच देशद्रोही आणि फुटीरतावादी चळवळीला पेव फुटले आहे. अशा सर्व समस्यांवर हिंदू राष्ट्राची स्थापना हा एकमेव उपाय आहे.

हे ही वाचा:

तेज प्रताप यादवांचा अजब तर्क, म्हणे बिहारमधील पूल कोसळायला भाजपा जबाबदार

लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेचे सडेतोड उत्तर

धक्कादायक! पुतण्याने बॉलला हात लावला म्हणून काकाचे बोट कापले

अहमदनगरमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवणाऱ्या चार जणांना अटक

संविधानिकदृष्ट्या भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे, हिंदु राष्ट्र संसद या सूत्रांसह विविध विषयांवर पॅनल डिस्कशन, मुलाखती, गटचर्चा आदींद्वारे समान कृती कार्यक्रम निश्चित करणे आणि हिंदुहिताचे ठराव संमत करणे, हे या अधिवेशनाचे स्वरूप असेल. हे कार्य समाजापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असे प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा