उत्तर प्रदेशमधील अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत असून २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य असा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लाचा अभिषेक करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रभू श्रीरामाच्या मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्त भेटवस्तू पाठवताना दिसत आहेत.
लखनऊ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिरासाठी खास घड्याळ बनवून पाठवले आहे. अनिल कुमार साहू यांनी सोमवार, २५ डिसेंबर रोजी राम मंदिर, अयोध्या जंक्शन आणि हनुमानगढ़ी मंदिराला प्रत्येकी एक- एक घड्याळ समर्पित केले आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी नऊ देशांची वेळ दर्शवते. याला जागतिक घड्याळ बोललं जात आहे.
लखनऊचे भाजी विक्रेते अनिल कुमार साहू हे गेली पाच वर्षे हे घड्याळ बनवत होते. हे घड्याळ एकाच वेळी नऊ देशांची वेळ सांगते. भारत सरकारकडून पेटंट मिळाल्यानंतर ते राम लल्लाला समर्पित करण्यात आले. साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे जागतिक घड्याळ सुपूर्द केले आहे. हे घड्याळ भारत, मेक्सिको, जपान, दुबई, टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन या नऊ देशांतील शहरांची वेळ सांगते.
हे ही वाचा:
खासदार जलील म्हणतात, राज्यात काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर हल्ला करण्यासाठी चिनी शस्त्रांचा वापर!
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक
हैदराबादचा क्रिकेटपटू झाला आयपीएस अधिकारी
उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या कामाची सतत पाहणी करत आहे. तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पोहचून राम मंदिराच्या उभारणीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता.