काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी या पिढीतल्या मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदूच होते, सगळ्यांचा जन्म हिंदू धर्मातच झालेला आहे, असे वक्तव्य काश्मिरात केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून अनेक स्थानिक मुस्लिमांच्या उपस्थितीतच आझाद यांनी ही परखड भूमिका व्यक्त केली आहे.
९ ऑगस्टचा हा व्हीडिओ असून त्यात आझाद हे स्थानिकांशी संवाद साधत आहेत. दोडा जिल्ह्यातील हा कार्यक्रम आहे. या व्हीडिओत गुलाम नबी आझाद सांगतात की, मी संसदेतही हे बोललेलो आहे. कदाचित ते तुमच्यापर्यंत पोहोचले नसेल. एका भाजपाच्या सदस्याने मला सांगितले की, कोण बाहेरून आले, कोण इथे जन्मले. तेव्हा मी त्यांना सांगितले की, कोण बाहेरचे कोण इथले हा प्रश्न नाही. सगळेच इकडचे आहोत. काही मुस्लिमांचे जन्मस्थान बाहेरचे असेल. त्यांनी मुघल सैन्यात काम केले असेल. पण अनेक हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्मांतरण करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
ईक्विप्ड सिनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश
रशियाचे ‘लुना-२५’ भारताच्या ‘चांद्रयान- ३’ च्या दोन दिवस आधी पोहचणार
वैमानिकाला विमानात हृदयविकाराचा झटका, सहवैमानिकांनी विमान उतरविले
‘मेक इन इंडिया’मुळे मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर
आझाद म्हणाले की, ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये कुणी मुस्लिम होते का? धर्मांतरण होण्यापूर्वी इथे सगळेच काश्मिरी पंडित होते. याचा अर्थ सगळे हिंदू धर्मातच जन्मलेले आहेत. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून आझाद बोलत होते. ते म्हणाले की, हिंदू, मुस्लिम, राजपूत, ब्राह्मण, दलित, काश्मिरी, गुज्जर असे सगळेच या देशातले आहेत. आपण सगळे एकत्र येऊन हे घर मजबूत करू शकतो. हीच आपली भूमी आहे. आपण कुणीही बाहेरून आलेलो नाही. आपली मुळे याच धरतीतील आहेत. आपण याच मातीत जन्मलो आणि याच मातीत आपण मिसळून जाणार आहोत. हिंदू धर्मीयाचे निधन झाले की, त्याला अग्नी दिला जातो, त्यांच्या शरीराची राख नद्यांमध्ये सोडली जाते.
आझाद यांनी गेल्या वर्षी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. डेमोक्रॅटिक प्रोग्रेस आझाद पार्टी असे त्याचे नाव आहे. २०२३मध्ये आझाद यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर विशेषतः गांधी कुटुंबियांवर टीका केली होती. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी काँग्रेस पक्षातील नेतृत्वात असलेले दोष उघड केले होते. त्यावरून आझाद यांना काँग्रेसच्या काही नेत्यांनी गद्दार ठरवले.