आता बर्मिंगहॅममध्ये मंदिराला घेराव घालून अल्ला हू अकबरच्या घोषणा

लिस्टरनंतर पुन्हा हिंदू मुस्लिम संघर्षाची परिस्थिती

आता बर्मिंगहॅममध्ये मंदिराला घेराव घालून अल्ला हू अकबरच्या घोषणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक फेरीत झालेल्या पराभवानंतर ब्रिटनच्या लिस्टर येथे भारत पाकिस्तानच्या समर्थकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. आता त्याचे रूपांतर हिंदू मुस्लीम संघर्षात झाले असून बर्मिंगहॅममध्ये याचे लोण पसरले आहे. तेथील दुर्गा भवन हिंदू सेंटरच्या बाहेर चेहऱ्यावर मास्क असलेल्या इस्लामी समर्थकांनी घेराव घातला आणि तिथे अल्ला हू अकबरच्या घोषणा देत वातावरण बिघडविले.

साध्वी ऋतंबरा यांचा ब्रिटनमध्ये कार्यक्रम होणार होता पण प्रकृतीच्या कारणास्तव कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. तरी इस्लामी आंदोलकांनी मंदिराला घेराव घालून निषेध करायला सुरुवात केली. त्याचे व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून अनेकांनी अल्ला हू अकबरच्या घोषणा देत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

अस्वस्थता वाढली, दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंची कोर्टात धाव

कॉमेडीचा बादशाह राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

कोरोना काळात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार

चंदीगढची पुनरावृत्ती? पवईतील मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये डोकावणारा अटकेत

 

इस्कॉनच्या राधारमण दास यांनी असाच एक व्हीडिओ शेअर करत हिंदूंच्या मंदिराबाहेर कशापद्धतीने घोषणाबाजी सुरू आहे, हे दर्शविले. त्यातील काही लोक मंदिराच्या कंपाऊंडवर चढले आणि घोषणा देऊ लागले.

जवळपास २०० लोकांचा हा जमाव या मंदिराबाहेर होता पण त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा मात्र मोठा ताफा तिथे आलेला नव्हता. या जमावातील सगळे लोक हे चेहऱ्यावर मास्क लावून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करत होते तसेच त्यांना तिथून निघून जाण्याचे आवाहन करत होते. काही पोलिसांनी या मंदिराभोवती कडे केले. या मंदिरात असलेल्या हिंदूंनी या संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग केले. सामाजिक कार्यकर्ती रश्मी सामंत यांनी सांगितले की, बर्मिंगहॅमच्या या मंदिराजवळ या इस्लामी जमावाला कसे काय हिंदूंवर गरळ ओकण्याची मुभा देण्यात आली ?

Exit mobile version