24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरधर्म संस्कृतीमुंबई उपनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री १२ पर्यंत गरबा खेळता येणार

मुंबई उपनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री १२ पर्यंत गरबा खेळता येणार

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

Google News Follow

Related

गरबा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी गरबा खेळण्यास रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे उत्तर मुंबई विभागातील गरबा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गरबा खेळण्यासाठी म्हणून एक दिवस वाढीव वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

प्रवीण दरेकर यांच्या या मागणीला यश आले असून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी गरब्याला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शनिवारी गरबा खेळण्यास १२ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.

प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, नवरात्री उत्सवानिमित्त गरबा रसिकांना गरबा खेळण्यासाठी उत्तर मुंबईत १० ते १२ मोठ्या गरब्यांचे आयोजन करण्यात आले आहे. एका सार्वजनिक गरब्यामध्ये दिवसाला एक ते दीड लाख गरबा रसिक गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. परंतु, गरबा रसिकांची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि गरबा बंद होण्याची वेळ यात खूप कमी अंतर असल्यामुळे वेळेअभावी त्याचा पुरेपूर आनंद घेता येत नाही. त्यामुळे गरबा रसिकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वाढवून दिलेली वेळ ही दोन दिवसा ऐवजी तीन दिवस करावी. कारण वाढवून देण्यात आलेला दिवस शनिवार येत आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्व गरबा रसिक गरबा खेळण्यासाठी उत्सुक आहेत. तरी गरबा रसिकांना गरबा खेळण्यासाठी अधिक एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी दरेकर यांनी केली होती.

हे ही वाचा:

एनडीए कॅडेट सैन्य प्रशिक्षणावेळी जखमी; उपचारादरम्यान मृत्यू

कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!

ललित पाटील भावासोबत ड्रग्स फॅक्टरीतून मिळवत होता बक्कळ नफा

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज परिपत्रक काढून नवरात्रौत्सवानिमित्त (सप्तमी) उद्या शनिवार, २१ ऑक्टोबर २०२३ रोजी गरब्याला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा