26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीपुढच्या वर्षी लवकर या, दीड दिवसांच्या बाप्पाला निराेप

पुढच्या वर्षी लवकर या, दीड दिवसांच्या बाप्पाला निराेप

विसर्जनासाठी प्रशासनाने केली सर्व तयारी

Google News Follow

Related

गणपती बाप्पांचे बुधवारी घराेघरी, सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळात वाजत गाजत आगमन झाले. गणेशभक्तांनी मनाेभावे बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली. आता दीड दिवसांच्या मुक्कामासाठी आलेल्या गणरायाला निराेप देण्याची वेळ आली आहे. पूर्जाअर्चा, आरती केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात हाेईल . गणरायाच्या आगमनानंतर संध्याकाळी मुंबई आणि उपनगरात पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण तरीही गणेशभक्तांचे उत्साह कमी झाला नाही.

गणपती बाप्पा माेरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात हाेईल . दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी मुंबईतल्या सर्व चाैपाट्यांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने विसर्जन ठिकाणी तयार ठेवण्यात आले आहेत.समुद्रात विसर्जन करताना निर्माल्य पाण्यात वाहत येत असल्याने माेठ्या प्रमाणावर निर्माल्याचा कचरा निर्माण व्हायचा. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या नुकसान व्हायचे पण गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकडून समुद्र किनारी निर्माल्य कलश व्यवस्था करण्यात येत असून त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ४८ निरिक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

बाप्पा आले घरी! सोन्याला झळाळी

बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’

विसर्जनाच्या वेळी बुडण्याच्या घटना घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नैसर्गिक विसर्जन स्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. समन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी २११ स्वागत कक्षही उभारण्यात आले आहेत. चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विसर्जनासाठी मुंबईत विविध ठिकाणी १५० कृत्रिम तलावांची व्यवस्था. कृत्रिम तलावांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी येणा-या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पौलादी प्लेटची व्यवस्था केली आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा