गणपती बाप्पा मोरया… घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया… घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

यंदा दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरोघरी यंदा मोठा उत्साह दिसून येत आहे. आज, ३१ ऑगस्ट म्हणजे श्री गणेश चतुर्थी. आठवडाभरापूर्वीच राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत होता. अखेर आज लाडक्या बाप्पांचं घरोघरी आगमन होणार आहे.

सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत. गणपती आगमनामुळे राज्यात मंगलमय वातावरण असणार आहे. सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन सोहळे यंदा भाविकांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीने बहरले होते.

मुंबईतले मानाचे आणि मोठ्या मंडळांच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी काल रात्रीपासूनच रांगा लागल्या आहेत. तर मुंबईतील सिद्धिवनायकाच्या मंदिरातही भाविकांनी गर्दी केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील ‘या’ गणेशोत्सव मंडळाने काढला तीनशे कोटींचा विमा

“दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं काय आहे?”

एकनाथ शिंदे यांच्यामुळे मेट्रो धावणार आहे

चित्रदुर्ग मठाच्या पुजाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्वीपासूनच सुरु झाली होती. तर यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही मोठी होती. अनेक जादा बस, रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या आहेत.

Exit mobile version