दोन लाख श्रीगणेश निघाले परदेशाला

दोन हजार कार्यशाळांमधून दोन लाख गणेशमूर्ती पाठवल्या

दोन लाख श्रीगणेश निघाले परदेशाला

राज्यासह भारतात साजरा होणारा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने गणेशभक्तांनी बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. परदेशातही भारतीयांकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून यासाठी गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात. लाखोंच्या संख्येने या मूर्ती भारतातून पाठवल्या जातात.

महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातील पेणच्या मूर्तींना राज्यासह जगभरात मोठी मागणी असते. गेल्यावर्षी पेणच्या सुमारे दोन हजार कार्यशाळांमधून सव्वा लाख गणेशमूर्ती निर्यात झाल्या होत्या. यंदा या संख्येमध्ये आणखी वाढ झाली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा ७५ हजारांनी वाढ झाली आहे.

यंदाच्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी बाप्पांचे आगमन होणार असून आतापर्यंत १५ लाख गणेश मूर्तींची निर्मिती झाली आहे. तर, दोन लाख गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. दरम्यान, पेणच्या गणेश मूर्तींना जीआय (जिऑग्राफीकल इंडेक्स) मानांकन आणि गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला असल्यामुळे या मूर्तींना आणखी मागणी आहे. यामुळेच परदेशात निर्यात होणाऱ्या गणेशमूर्तींच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, थायलंड, जर्मनी, न्यूझीलंड, जपान या देशांमध्ये पेणच्या गणेशमूर्ती पाठविल्या जात होत्याचं पण मागील काही वर्षांपासून आता युएई आणि सिंगापूरमध्येही हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने तेथेही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. त्यामुळे या देशांतूनही गणेशमूर्तीची मागणी वाढली.

हे ही वाचा :

अयोध्येत ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी सलमानच्या मुसक्या आवळल्या !

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटींच्या उलाढालीचे थर

भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !

तीन महिन्यांपासून पेण तालुक्यातील गणेशमूर्ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशात आणि परदेशात पाठवल्या जात आहेत. तालुक्याच्या विविध भागांत दोन हजारांच्या आसपास कारखान्यांमधून १५ लाख गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यात शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा समावेश आहे. गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायात तालुक्यातील १५ ते १८ हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Exit mobile version