गणेशमूर्तिकांरांचे नुकसानच नुकसान

गणेशमूर्तिकांरांचे नुकसानच नुकसान

राज्यावर आणि देशावर असणारा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदाही बाप्पाचे आगमन साधेपणाने होणार आहे. पण गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा घातल्यामुळे मूर्तिकारांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.

गृह विभागाच्या सूचनेनुसार सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीची उंची चार फूट असेल, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंच असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांमुळे मूर्तिकारांवर आर्थिक संकट आले आहे. मुंबईत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, परंतु गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातल्यामुळे मूर्तिकारांना ३५ ते ४० कोटींचा फटका बसणार आहे. शिवाय, गेल्या महिन्यात पडलेल्या प्रचंड पावसामुळे, महापुरामुळे अनेक गणेशमूर्तीकारांचे आर्थिक नुकसान झाले. मूर्ति कारखान्यात शिरलेले पाणी आणि त्यामुळे मूर्त्यांचे झालेले नुकसान याचाही फटका त्यांना बसला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळांमध्येही मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात. यंदाही मंडपातील गर्दीवर मर्यादा आहेत. शिवाय मिरवणुकाही निघणार नाहीत. गणपती मंडपात थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी; आरती, भजन अशा कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी; सांस्कृतिक उपक्रमांऐवजी आरोग्यविषयक जनजागृती करणारे कार्यक्रम राबवावेत तसेच गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावत करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

‘त्या’ बसचालकाविरोधात गुन्हा दाखल

श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ

पुरूष हॉकी संघाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून कौतूक

आज ५ ऑगस्ट…मोदी सरकार साधणार वचनपूर्तीची हॅटट्रिक?

गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे तयार करणार असून १७० ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात येणार आहेत. मोठ्या गृहसंकुलाच्या परिसरात मूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात येणार आहेत. २०१९ मध्ये ३२ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेने केली होती. २०२० मध्ये कोरोनामुळे गणपतीची प्रतिष्ठापना कमी प्रमाणात झाली होती; पालिकेने १६८ कृत्रिम तलाव बांधले होते. गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर कोविड वाढीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले होते.यावर्षी भाविकांना गणेशमूर्ती महापालिकेला दान कराव्या लागणार आहेत.

Exit mobile version