यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असून गणेशोत्सवासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये घरगुती गणेशमूर्ती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आली आहे. याचा फटका मूर्तीकारांना बसला आहेच पण त्यासोबत गणेशमूर्तींची सजावट करणाऱ्या कलाकारांनाही बसला आहे. त्यांचा व्यवसाय मंदावला आहे.
गणेशमूर्तींची सजावट करणारे कलाकार हे मूर्तीच्या प्रत्येक फुटामागे दर आकारत असतात. मूर्तींची उंची कमी असल्यामुळे कलाकारांच्या उत्पन्नातही घट झाली. अनेक कलाकारांना यंदा ७० ते ८० टक्के नुकसान सहन करावे लागले आहे. गणेशमूर्तीसोबत धोतर, मुकुट, मुकुटावर हिरे- मोत्यांची सजावट, कंठी, मूर्तीसाठी दागिने अशा मागण्या भाविकांकडून केल्या जातात. त्यामुळे कलाकारांना यातून व्यवसाय प्राप्त झाला आहे.
हे ही वाचा:
‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मलिकांवर पलटवार
…म्हणून कोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय नाराज!
ठाण्यात फेरीवाल्यांच्या टोळ्या सक्रीय
शिवाजी पार्कमधील पुत्रंजीवाच्या झाडाचा घेतला जीव
कोरोनामुळे अनेक जण आर्थिक संकटात आहेत. अनेक मंडळांनी कोरोनाकाळात वर्गणी गोळा केलेली नाही त्यामुळे त्यांच्याकडूनही अतिरिक्त खर्च टाळला जात आहे. गणेशमूर्तींची अतिरिक्त सजावट करण्यासाठी यंदा फार कमी लोक पुढाकार घेत आहेत. तर काही जण कमी बजेटमध्ये मूर्ती सजवून घेत आहेत. बाजारात साहित्यदेखील महाग झाले आहे.
मागील काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचे रूप बदलत गेल्याने आता भाविकांच्या गणेशमूर्तीबाबत असणाऱ्या कल्पना आणि आवडीनिवडी बदलल्या आहेत. गणेशमूर्तीसोबत लोक आता सजावटीचे साहित्य, मूर्तीसाठी दागिने, रोषणाई अशीही खरेदी करत असतात. मूर्तींना सजावट करणाऱ्या कलाकारांनाही चित्रशाळांमध्ये आणि मंडळांमध्ये बोलावले जाते. मात्र यंदा मूर्तींची उंची कमी असल्याने काम आणि मानधन दोन्हीमध्ये घट झाली आहे.