गणेशोत्सव आणि कोकण हे एक अनोखे समीकरण आहे. खास गणेशोत्सवाच्या गाडीने जाण्यासाठी कोकणवासियांनी कित्येक दिवस आधीपासून तयारी केली होती. एव्हाना त्यामुळेच कोकणात घरोघरी गणपतीच्या नैवेद्याचा सुवास येत आहे. टाळ मृदुंगांच्या तालावर आता कोकणवासियांच्या दिवसाल सुरुवात झालेली आहे. कोकणातील घरोघरी गणरायाची यथासांग पूजा केली गेली आहे. या पूजेच्या जोडीला आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तर आहेच. त्यामुळेच सध्याच्या घडीला कोकणात आरती आणि भजनांच्या स्वर दुमदुमु लागले आहेत.
मुंबईतील गणेशोत्सव यंदाही कोरोनामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता घेता येणार आहे. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोकणात सध्या गणरायाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालेय. बाप्पाला गऱ्हाणे घालून कोकणात गणपती उत्सवाला सुरवात होते. कोकणात शेताच्या बांध्यातून अनेक चाकरमान्यांनी गणपती आणून ते स्थापन केले आहेत. कोकणची खरी ओळख परंपरा आणि संस्कृतीसाठी गणेशोत्सवाची ओळख आहे. ढोल ताशांच्या गजरात मुंबईचा चाकरमानी कोकणात गणेशोत्सवाचा आनंद घेत आहे.
गणपती बाप्पा हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह राज्यभरात पाहाला मिळत आहे. मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस या विद्येच्या देवाची मनोभावे सेवा केली जाणार आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज गौरीआगमनाची पूर्व तयारी सुरु आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये कलाक्षेत्रावर अवकळा!
योगींचा निर्णय; मथुरेत मांस, मद्यपान वर्ज्य
बुरख्यातील महिलांना पसंत आहे तालिबानी कायदा
पंतप्रधान आमच्याशी आपुलकीने बोलतात, याचे परदेशी खेळाडूंना कौतुक वाटते!
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना मुंबईसह राज्यभरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणपतींचं मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली गेली आहे. तर पुण्यातली जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. कोकणात एव्हाना चाकरमानी आरती आणि भजनामध्ये चांगलेच रंगले आहेत.