कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला गावामध्ये गणपतीच्या मंडपावर मुस्लिम जमावाने दगडफेक केल्याचे प्रकरण घडल्यानंतर त्याविरोधात हिंदू समुदायाने आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांच्या व्हॅनमध्ये एक गणपतीची मूर्ती बंदिस्त असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. आंदोलकांकडून गणपतीची मूर्ती घेऊन ती व्हॅनमध्ये बंद करण्यात आली होती. हा व्हीडिओ व्हायरल झालाच पण त्याची छायाचित्रेही देशभरात व्हायरल झाली.
हे आंदोलन मंड्यामधील नव्हते तर बेंगळुरूमधील होते. बेंगळुरूमध्ये हे आंदोलन घेण्यात आले होते. त्यावेळी ही गणेशाची मूर्तीही आंदोलकांनी सोबत आणली होती. त्यावेळी ती मूर्ती जप्त करून ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये ठेवण्यात आली. त्याचे फोटो मग काढले गेले होते. त्यानंतर पोलिसांनी ती मूर्ती पोलिस जीपमध्ये ठेवली. पण या आंदोलकांपैकी ४० जणांना ताब्यात घेण्यात आले. बेंगळुरू शहर गणेश उत्सव समितीने हे आंदोलन घेतले होते.
हे ही वाचा:
घाटकोपरच्या भूतबंगल्याला लागली आग, १२ जण रूग्णालयात दाखल
जम्मू काश्मीरमध्ये तब्बल ३७ वर्षानंतर घरोघरी प्रचार !
जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा
गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची सांगत वकिलाला लुटणारा सापडला सिंधुदुर्गात
पोलिस व्हॅनमध्ये गणेशाची मूर्ती ठेवलेली असताना अनेकांनी त्याचे फोटो काढले आणि त्यातून मग गणेशालाच कसे बंदिस्त करून ठेवले आहे असा संदेश सगळीकडे पोहोचला. बेंगळुरू दक्षिणेचे खासदार तेजस्वी सूर्या यांनीही हे फोटो शेअर करत पोलिसांवर टीका केली. हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस शासित राज्यात हिंदू देवतांची अशी विटंबना कशी काय होते? हिंदूंच्या भावनांशी कसा काय खेळ खेळला जाऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.