हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडवा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकीर्दीवर टाकलेला प्रकाश…
डॉ. केशव हेडगेवार यांचा जन्म नागपूर मध्ये एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते संस्थापक होते. डॉ. हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले.ते मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९१० साली वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कलकत्त्याला गेले. तरुण पणातच त्यांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेऊन, शाळेत असतानाच व्हिक्टोरिया राणीच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त वाटण्यात आलेली मिठाई त्यांनी रागाने फेकून दिली होती. शिवाय त्यांनी ‘वंदे मातरमचा’ जयघोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तर बंगालमध्ये प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यानी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकत्त्याला घेतले होते. तिथेच अनुशीलन समिती स्थापन करून ते क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख बनले होते.
पुढच्या काळात त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक आंदोलने करून तुरुंगवास सुद्धा भोगला होता. १९२० ते १९३१ या काळात त्यांनी अनेक सत्याग्रह आणि आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वेगळे तत्वज्ञान आणि कार्यपद्धती दिली. त्यांच्याच रचलेल्या पायावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यशस्वीरीत्या डौलात उभा आहे. डॉ. हेडगेवार कुशल संघटक, मार्गदर्शक, आणि उत्तम नेते होते. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक कार्यकर्ते तयार झाले.
हे ही वाचा:
संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!
रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?
इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात चिनी फॉलोअर्स
भगवा ध्वज , गुरु, गुरुदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य आणि व्यक्तीला गौण स्थान , सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैनंदिन शाखा आणि त्याअंतर्गत अनेक चांगले उपक्रम, हि संपूर्ण कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रुजवली. सच्चे नेतृत्व , त्याग , समर्पण भावना , सेवा, दूरदर्शी विचार, शिस्तबद्ध, आणि व्रतस्थ कार्यजीवनशैली ही डॉक्टरांच्या कार्याच्या जीवनशैलीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वाची विविध अंगे होती. २१ जून १९४० रोजी डॉक्टरांचे निधन झाले. त्याच्या एक वर्ष आधीच त्यांनी संघाच्या कार्यपद्धती बाबतीत स्वयंसेवकांना निर्देश देऊन ठेवले होते. संघाची निश्चित कार्यपद्धती अशाप्रकारे तयार झाली होती.