‘द केरळ स्टोरी’ वरून वाद उद्भवले असतानाच काही पीडित स्वत: पुढे येऊन त्यांच्या कहाण्या सांगत आहेत. अनघा जयगोपाल आणि विशाली शेट्टी या दोन महिलांनी त्यांचे धर्मांतर आणि पुन्हा हिंदू धर्मात परत येण्याचे अनुभव कथन केले. हा चित्रपट केवळ केरळ किंवा देशातील इतर राज्यांमध्येच नाही तर जगभरात काय घडत आहे, याचे वास्तव चित्रण करतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अनघा जयगोपाल केरळमधील एर्नाकुलम येथील आहेत. तिचे वर्गमित्र आणि सहकाऱ्यांनी तिचे ब्रेनवॉश केले होते. ती म्हणाली, ‘मी बौद्धिक जिहादची बळी होते. पण लव्ह जिहाद अस्तित्वात आहे. चित्रपटातील मुख्य पात्र- आपल्याजवळ नेमके किती देव आहेत, आपण या प्रकारच्या देवांची पूजा का करतो?’ इत्यादी अनेक प्रश्नांना सामोरे जाते. मला माझ्या रूममेट्सकडून असेच प्रश्न विचारले जायचे. या प्रश्नांची उत्तरे मला देता आली नाहीत. माझ्या पालकांनाही त्यांची उत्तरे देता आली नाहीत. आपले पूर्वज तसे करतात, म्हणून आपण या प्रथा पाळत आहोत, असे ते सांगत. नंतर मला वाटले की हिंदू धर्मात काही अर्थ नाही. ते प्रश्न विचारून आणि समोरच्याला गोंधळात टाकून धर्मांतराचे पहिले पाऊल उचलतात, असे ती म्हणाली.
‘दुसऱ्या टप्प्यात त्यांनी माझ्या धर्मावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यावेळीही मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकले नाही. मग त्यांनी मला हळूहळू सांगितले की इस्लाम हाच खरा मार्ग आहे आणि अल्लाह हा एकमेव देव आहे. त्यांनी मला पैगंबर मोहम्मद आणि कुराण इत्यादींबद्दल सांगितले. त्यांनी मला इस्लाममध्ये स्त्रीने कसे कपडे घालावेत, याची माहिती दिली. हळूहळू त्यांनी माझ्यासोबत कुराण भाषांतर, एमएम अकबर आणि झाकीर नाईक यांचे व्हिडिओ शेअर केले. मी ते सर्व व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली,’ असे अनघा सांगते.
पाच ते सहा वर्षांच्या इस्लामिक अभ्यासानंतर ती हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी इतकेच नव्हे तर तर मानवविरोधीही बनली. गैरमुस्लिमांना काफिर मानायला लागली. ‘माझे ब्रेनवॉश झाले. मी माझ्या आई- वडिलांना काफिर मानले. मला हिंदू देवता, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचा तिटकारा वाटू लागला. त्यांनी मला हिंदू संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक गोष्टी सांगितल्या,’ असे तिने सांगितले.
सहा वर्षांनंतर तिचे कायदेशीररीत्या धर्मांतर केले गेले. ‘मी इस्लामचे पालन केले. मी मुस्लीम स्त्रीप्रमाणे हिजाब आणि पूर्ण कपडे घालू लागले. मी इस्लाममध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करत होते,’ अशी माहिती तिने दिली.
हिंदू धर्मात ती कशी आली, याबाबतही अनघाने सांगितले. अनघा जयगोपाल म्हणाल्या, “त्यावेळी संघाच्या काही कार्यकर्त्यांना माझ्याबद्दल कळले आणि त्यांनी माझा शोध घेतला. मी त्यांना भेटले. त्यांनी माझ्या कुटुंबाला अर्श विद्या समाजम् या संस्थेशी जोडले. माझ्या भावाने मला अशी एक जागा आहे, जिथे तुम्हाला तुमची सर्व उत्तरे मिळू शकतात, असे सांगितले. मी एका अटीवर तिथे यायला तयार झाले. ती अट म्हणजे, ते ठिकाणी मी सोडल्यावर मी पूर्ण हिंदू किंवा पूर्ण मुस्लिम असेन. त्या अटीसह, मी आर्श विद्या समाजम्मध्ये प्रवेश केला आणि आचार्य श्री मनोज यांना भेटले. सुरुवातीला त्यांच्याशी माझा वाद झाला आणि त्यांनी कुराणमधील तथ्यांकडे लक्ष वेधून मला इस्लाममधील फसवणूक आणि धोक्याची जाणीव करून दिली. त्या धोकादायक वाटेवर मी चाललेय, ते मला जाणवले. अखेर, मी ज्या प्रसंगातून गेले आहे, त्यातून इतर कोणत्याही मुलीने जाऊ नये, यासाठी मी आर्श विद्या समाजासोबत आयुष्यभर काम करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासून मी आर्श विद्या समाजाशी निगडीत आहे. आता आम्हाला दररोज १० ते २० फोन कॉल येतात, ज्यात त्यांची मुले कट्टरपंथी होत आहेत, त्यांना वाचवा, अशी मदतीची साद घातलेली असते,” असे अनघा सांगते.
विशाली शेट्टीनेही तिच्या धर्मांतराचा अनुभव सांगत चित्रपटात सत्य कथन केले असल्याचे स्पष्ट केले. ती म्हणाली, “माझे मुस्लीम कट्टरतावादासंदर्भातील ब्रेनवॉशिंग माझ्या कामाच्या ठिकाणी झाले. मी बेंगळुरूमध्ये एका आयटी कंपनीत काम करत होते. माझ्या सहकाऱ्यांनी मला माझ्या धर्माविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, ज्याचा मी सुरुवातीला बुद्धीने आणि तर्काने बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर माझ्याकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. त्यावेळी माझ्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला. त्यांनी नंतर त्यांच्या विचारधारा माझ्यात पेरण्यास सुरुवात केली. ते मला योग्य वाटू लागले. अखेर आर्ष विद्या समाजाच्या संपर्कात आल्यामुळे मल चूक उमगली आणि मी पुन्हा सनातन धर्माकडे परत येऊ शकले,’ असे विशाली सांगते.
जेव्हा तिला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल विचारले गेले, तेव्हा हे केवळ केरळपुरते मर्यादित नाही, असे तिने ठामपणे सांगितले. ती म्हणाली, “आम्ही चित्रपट पाहिला आहे आणि चित्रपटात जे दाखवले आहे त्यावरून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की आज केवळ केरळमध्येच नाही तर भारतात अनेक ठिकाणी हेच घडत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात. समाजात घडणाऱ्या घटनांचे चित्रण हा चित्रपट अतिशय अचूकपणे करतो. आर्श विद्या समाज गेल्या २३ वर्षांपासून धर्मांतरित लोकांना परत हिंदू धर्मात आणत आहे. आम्ही सात हजारांहून अधिक लोकांना परत आणले आहे,’ असा दावा तिने केला.
हे ही वाचा:
‘कोणाचेच घर वाचणार नाही’- इम्रानच्या सुटकेनंतर पाकिस्तानच्या मंत्री बोलल्या
इम्रान खान यांना दिलासा, पण भविष्य अंध:कारमय
“सुषमा अंधारेंनी शरद पवारांऐवजी ठाकरेंसमोर रडावं”
वाढताहेत उन्हाच्या झळा, मुंबईकरांनो पुढील दोन दिवस तब्येत सांभाळा!
तिने ‘लव्ह जिहाद’ला ‘लव्ह ट्रॅप जिहाद’ म्हटले, विशेषत: मुलीचे धर्मांतर करण्याच्या कटाचा हा सापळा आहे. ती म्हणाली, ‘जर हे केवळ मुलगा आणि मुलगी यांच्यातील नाते असेल तर त्यात काही अडचण नाही. कोणत्याही दोन व्यक्ती प्रेमात पडू शकतात आणि नातेसंबंध निर्माण होऊ शकतात, लग्न करू शकतात. पण अडचण ही आहे की, प्रेमाच्या नावाखाली कट्टरतावाद आणि टप्प्याटप्प्याने ब्रेनवॉशिंग केले जात आहे. याला ‘लव्ह जिहाद’ म्हणण्यापेक्षा आपण याला ‘लव्ह ट्रॅप जिहाद’ म्हणू इच्छितो, म्हणजेच ते प्रेमाच्या बहाण्याने महिला किंवा तरुणींना फसवत आहेत आणि त्याद्वारे त्यांचे टप्प्याटप्प्याने धर्मांतर करत आहेत.
पहिली पायरी म्हणजे ते त्यांना अडकवतात. दुसऱ्या टप्प्यात ते मुलींना सांगतात की, जर माझ्या घरच्यांनी तुम्हाला माझ्या घरात स्वीकारायचे असेल तर तुमचे धर्मांतर करावे लागेल. ते म्हणतात की हे फक्त लग्नासाठी आहे. नावापुरते आहे, फक्त पालकांनी स्वीकारण्यासाठी तुम्हाला लग्नासाठी धर्मांतर करावे लागेल. पण मग, धर्मांतर ही केवळ कागदोपत्री किंवा केवळ औपचारिकता नाही. धर्मांतर प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी तिला इस्लामिक अभ्यासाचा दोन महिन्यांचा योग्य कोर्स करावा लागेल. त्या प्रक्रियेत त्यांना नेमकं काय शिकवलं जातं त्याचंच चित्रण चित्रपटात करण्यात आलं आहे. मुलीचे किंवा मुलाचे टप्प्याटप्प्याने कट्टरपंथाकडे नेणारे नातेसंबंध, देशद्रोही, मानवताविरोधी आणि समाजविरोधी मानसिकता अंगीकारण्यास भाग पाडले जाते, आणि हीच खरी समस्या आहे,’ असे विशाली सांगतात.