राहुल गांधींच्या रामनवमी शुभेच्छांमध्ये प्रभू श्री रामांच्या फोटोचा विसर

काँग्रेसच्या राम विरोधी भुमिकेची आठवण; लोकांकडून टीका

राहुल गांधींच्या रामनवमी शुभेच्छांमध्ये प्रभू श्री रामांच्या फोटोचा विसर

देशभरात रामनवमीचा उत्साह असून अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणामुळे हा उत्साह आणि जल्लोष यंदा द्विगुणीत झाला आहे. अयोध्या नगरीतही राम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांनीही देशभरातील जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यानंतर आता राहुल गांधी हे मात्र टीकेचे धनी झाले आहेत. राहुल गांधी यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये प्रभू श्री रामांचा फोटो नसल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देत म्हटले आहे की, रामनवमीच्या शुभेच्छा. हे शुभ पर्व आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणेल अशी आशा आहे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. तसेच त्यांनी यासोबत धनुष्यबाणाचा फोटोही पोस्ट केला आहे. मात्र, त्यात प्रभू श्रीरामांचा फोटो नसल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. शिवाय यापूर्वी त्यांनी राम लल्लांच्या अस्तित्वारही प्रश्न केले होते त्यामुळेचं श्री रामांचा फोटो वापरला नसल्याचे बोलले जात आहे.

राम मंदिरावर आणि रामायण तसेच सनातन धर्मावर अनेक काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी गरळ ओकण्याचे काम केले आहे. विरोधकांच्या इंडी आघाडीतील अनेक नेत्यांनीही या मुद्द्यांना राजकारणाचा मुद्दा जोडत काहीही बरळण्याचे काम सातत्याने केले आहे. मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि राहुल गांधी यांनी याबाबत मौन धारण केल्याचे दिसून आले आहे. शिवाय राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने त्यांचा प्रभू रामविरोधी चेहरा दाखवून दिला होता. यानंतर अनेक राज्यांमधील नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांच्या हिंदुविरोधी भूमिकेवर टीकाही केली होती. राहुल गांधी यांच्या या पोस्टमुळे आता यूपीए सरकारने प्रभू रामाचे अस्तित्व नाकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते हा विषयही पुन्हा चर्चेत आला आहे.

हे ही वाचा.. 

महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट का सोडला?

रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत रामभक्तांची अलोट गर्दी

दाऊद छोटा शकील गँगच्या नावे एकनाथ खडसेंना धमकीचे फोन

कोलकात्याच्या सुनील नारायणची राजस्थानविरुद्ध दमदार खेळी

२०१९ मध्येही राहुल गांधी यांनी अशाच राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हाही सोशल मीडियावर राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात आले होते. काँग्रेसच्या भूमिकेबद्दल त्यांना सुनावत लोकांनी म्हटले होते की, आता निवडणुका आल्यामुळे तुम्हाला प्रभू राम आठवले आहेत का? प्रभू राम यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना निवडणुकीपूर्वी राम आठवले आहेत का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. आताही तसेच प्रश्न राम भक्तांकडून उपस्थित केले जात आहेत. आता २०२४ सालच्या लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या आहेत. त्यात आता राहुल गांधी यांना रामनवमीच्या शुभेच्छा द्याव्या वाटत आहेत. त्यातही त्यांनी प्रभू रामांचा फोटो वापरलेला नाही यावरून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version