अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कमाल, मतदानाआधीच भाजपाचे पाच उमेदवार विजयी

निवडणूक आयोगाने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कमाल, मतदानाआधीच भाजपाचे पाच उमेदवार विजयी

एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. आचारसंहिता लागलेली आहे आणि निवडणुकांच्या तारखा, निकालाची तारीख निश्चित झालेली आहे, पण अद्याप मतदानाला प्रारंभही झालेला नाही. त्यातच अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही लागल्या आहेत. पण तिथेही अद्याप मतदानाला वेळ असताना भाजपाने आपल्या पाच जागा निवडूनही आणल्या आहेत. या विजयांमुळे भाजपाला अरुणाचलमध्ये दमदार यश मिळेल असे बोलले जात आहे. विरोधकांना या पाच जणांविरोधात उमेदवारही उभे करता आले नाहीत.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह भाजपाच्या पाच उमेदवारांनी ही निवडणूक जिंकली आहे. कारण त्यांच्याविरोधात कुणीही उभे राहिलेले नाही. बिनविरोध त्यांनी विजय नोंदविला आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत

संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची संचालक; १ हजार कोटींचा वाईन स्कॅम

लोकसभेच्या रिंगणात राजू शेट्टींनी ‘माविआ’ची साथ सोडली

संदेशखालीतील महिला म्हणजे ‘शक्तीस्वरूप’

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी खांडू यांच्यासह पाच जणांविरोधात कुणीही अर्ज दाखल केला नाही. अर्थात, निवडणूक आयोगाने अद्याप विजयाची घोषणा केलेली नाही. ३० मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे त्यानंतरच या पाचही जणांचे विजय निश्चित केले जातील.

माजी मुख्यमंत्री खांडू यांनी मुक्तो विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. त्यांच्याविरोधात तिथे कुणाही उभे राहिले नव्हते. पापुम पारे येथेही भाजपाच्या उमेदवाराने बिनविरोध विजय मिळविला आहे. रातू टेची यांनीही बिनविरोध विजयश्री मिळविली आहे. झिरो मतदारसंघातून हॅगे आप्पा यांनीही बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. माचू मिठी, ताको, दुकोम यांनीही आपापले विजय निश्चित केले आहेत.

 

Exit mobile version