अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची पहिली झलक समोर!

रामलल्लाची मूर्ती गर्भागृहात स्थानापन्न

अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची पहिली झलक समोर!

२२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. मात्र ही मूर्ती शुभ्र वस्त्राने झाकण्यात आली आहे. गुरुवारी रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या काही विधींसाठी गर्भागृहात स्थानापन्न करण्यात आली होती.

मैसुरूस्थित शिल्पकार अरुण योगिराज यांनी ही ५१ इंची मूर्ती साकारली असून ती गुरुवारी भल्या पहाटे मंदिरात आणण्यात आली होती. गुरुवारी दुपारी रामलल्लाची मूर्ती गर्भागृहात स्थानापन्न करण्यात आली, अशी माहिती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित पुजारी अरुण दीक्षित यांनी दिली.

हे ही वाचा:

रामभक्तीत लीन जर्मन नायिका!

‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्वांनी सहभागी होणे, हेच असेल रामराज्य’

‘एमपीएससी’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शेतकऱ्याच्या मुलाची बाजी

बलोच फुटीरतावाद्यांची पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा!

यावेळी श्रीरामाचा अखंड जप सुरू होता. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे या मंदिराचे बांधकाम आणि अन्य सोहळ्याचे काम पाहिले जात आहे. ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी ‘प्रधान संकल्प’ हा विधी केला. ‘प्रभू रामाची प्रतिष्ठापना ही सर्वांच्या भल्यासाठी, या देशाच्या भल्यासाठी, मानवतेच्या हितासाठी आणि ज्यांनी या मंदिराच्या कामाला हातभार लावला, त्या सर्वांसाठी होत असल्याची संकल्पना या ‘प्रधान संकल्पा’मागे आहे.

‘याशिवाय, सर्व विधीवित पूजा करण्यात आली आहे. सर्व ब्राह्मणांना ‘वस्त्रे’ प्रदान करण्यात आली असून प्रत्येकाला कामाचे वाटपही करण्यात आले आहे,’ असे दीक्षित यांनी सांगितले.२२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे मंदिर सर्वसामान्य रामभक्तांसाठी खुले होणार आहे.

Exit mobile version