ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण

ज्ञानवापी माशिदिमधील पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून ही कार्यवाही कडेकोट बंदोबस्तात शनिवार, १४ मे रोजी पार पडली. उद्या पुन्हा सर्वेक्षण होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने ज्ञानवापी मशीद संकुलापासून एक किलोमीटर अंतरावरील वाहतुकीवर बंदी आणली होती. वाहने इतर मार्गाने वळवण्यात आली होती.

वकील आयुक्त अजय मिश्रा आणि फिर्यादी-प्रतिवादी बाजूचे सुमारे ५२ लोक ज्ञानवापी मशिदीच्या आवारात गेले होते. यावेळी पाहणी पथकातील सर्वांचे मोबाईल बाहेर जमा करण्यात आले होते. तसेच या पथकाकडून तळघरांची व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. परिसराच्या व्हिडीओग्राफीसाठी विशेष कॅमेरे आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. पाच खोल्यांची व्हिडिओग्राफी करण्यात आली.

श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची कसून तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. आजूबाजूची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. राज्याचे डीजीपी आणि मुख्य सचिव सर्वेक्षणावर लक्ष ठेवून असून साधारण दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम केले गेले.

मंगळवार, १७ मे रोजी न्यायालयात अहवाल सादर करायचा असल्याने सोमवारीही सर्वेक्षण सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले असून गरज भासल्यास १७ तारखेलाही सर्वेक्षण पूर्ण करून न्यायालयाची परवानगी घेऊन अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”

नातवंडे द्या, नाहीतर पाच कोटी भरपाई द्या; न्यायालयात केला अजब दावा

… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग

शरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल

आयोगाच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर एफआयआर नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी वकील आयुक्त अजय मिश्रा यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्यासोबत विशेष न्यायालयाचे आयुक्त विशाल सिंग आणि सहाय्यक न्यायालयाचे आयुक्त अजय प्रताप सिंग हे आहेत.

Exit mobile version