फातिमा झाली कविता, अब्दुल्ला झाला शिवप्रसाद

३० वर्षानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

फातिमा झाली कविता, अब्दुल्ला झाला शिवप्रसाद

फतेहपूरमध्ये ३० वर्षांपूर्वी हिंदूतून धर्मांतरण करून मुस्लिम बनलेली कविता उर्फ फातिमा आणि शिवप्रसाद उर्फ अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला आहे. वाराणसीमध्ये राहणारे कविता आणि शिवप्रसाद फतेहपूरच्या हथनांग पोलिस क्षेत्रातील अधारी गावात राहातात. राम सेना आणि पोलिसांच्या उपस्थितीत त्यांची घरवापसी झाली. त्यांनी यावेळी सुंदरकांडचे पठण आणि हवन केले.

सुमारे ३० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बनारसमध्ये राहणारे कविता व शिवप्रसाद उर्फ गुड्डू यांनी विपरित परिस्थितीत फतेहपूरच्या अधारी गावात आश्रय घेतला होता. या दरम्यान त्यांना अज्ञात कारणांमुळे मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला होता. मात्र रामसेनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. यावेळी कुटुंबाने हिंदू संघटना आणि पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

हे ही वाचा:

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार; तर असिफ अली झरदारी नवे राष्ट्रपती

हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत

मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर

दातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!

या वेळी पोलिस प्रशासनासह रामसेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुंदरकांडाचे पठण झाले. पती-पत्नी कविता व शिवप्रसाद यांचे यावेळी शुद्धिकरणही झाले. काही वर्षांपूर्वी त्यांनी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार, आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना खूप मानसिक त्रास देण्यात आला. आता मात्र ते खूप आनंदित आहेत. मी घरवापसी करून खूप खूष आहे, अशी प्रतिक्रिया कविता यांनी दिली. मी सनातनी होते आणि पुन्हा एकदा सनातनी झाल्यामुळे मला माझा अभिमान वाटतो आहे, असे कविता यावेळी म्हणाल्या.

Exit mobile version