ज्ञानवापी प्रकरणात माहिती लीक केली; आयुक्त मिश्रांची हकालपट्टी

ज्ञानवापी प्रकरणात माहिती लीक केली; आयुक्त मिश्रांची हकालपट्टी

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. न्यायालयाच्या आयुक्तांनी अहवाल सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. त्यावर मंगळवार, १७ मे रोजी म्हणजे आज वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली आहे. दरम्यान, ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाने वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना पदावरून हटवले आहे.

ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू बाजूने केला जात आहे, तर मुस्लिम बाजूने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर आज वाराणसी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयीन आयुक्तांनी पाहणी अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली होती. न्यायालयाने ही वेळ दिली आहे.

ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाने वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण अजय मिश्रांचा सहकारी आरपी सिंह मीडियाला माहिती लीक करत असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय मुस्लिम पक्षाने अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणीही केली होती. पुढे आता अजय प्रताप सिंग आणि विशाल सिंग हे सर्वेक्षण टीमचा भाग राहतील. आता विशाल सिंह न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत. ज्या अजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले, त्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद!

‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं

गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश

१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत

दरम्यान, सुप्रीम न्यायालयातही या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. मशीद समितीच्या याचिकेवर ही सुनावणी होत आहे. समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सर्वेक्षण करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Exit mobile version