24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरधर्म संस्कृतीविशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करा, शस्त्रसाठा जप्त करा

विशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करा, शस्त्रसाठा जप्त करा

माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली मागणी

Google News Follow

Related

विशाळगडावरील दर्गा हजरत पीर मलिक ए रेहान या दर्ग्यावर तसेच गडावरील बेकायदेशीर बांधकामांवर कोंबिंग ऑपरेशन करून कोल्हापूर पोलीस प्रशासनाने शस्त्रसाठा जप्त करावा, अशी मागणी विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक, हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली आहे. त्यांनी असा आरोप केला की, १४ जुलै रोजी विशाळगडावरील इस्लामिक अतिक्रमणाविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवभक्तांच्यावर मलिक ए रेहान च्या २००ते २५०भक्तांनी तलवारी, लाठ्याकाठ्या आणि कोयते याच्यासह हल्ला केला. ह्या तलवारी आल्या कुठून? जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी यासीन भटकळ याचे विशाळगडावर सहा दिवस वास्तव्य होते या गडावरील अतिक्रमणधारकांचे इस्लामी दहशतवाद्यांशी लागेबंधे आहेत का?गडावर आणि कोणत्या प्रकारची शस्त्र आहेत? यासाठी पोलीस प्रशासनानं कोंबिंग ऑपरेशन राबाववं, अशी मागणी नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

विशाळगडावर झालेल्या इस्लामिक अतिक्रमणाविरुद्ध शिवभक्तांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाल्यामुळेच हा प्रकार घडला. विशाळगडावर या अतिक्रमणधारकांच्यामुळे बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळेच विशाळगड हा अपवित्र झाला आहे, अशा अतिक्रमणधारकांना शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करू नये अशी ही मागणी नितीन शिंदे यांनी केली. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सरकारला खोटी माहिती पुरवण्याचं काम केलं. आठ मालमत्ताधारकांनी कोर्टात जाऊन स्थगिती मिळवली असताना उर्वरित बांधकाम जमीन दोस्त करायला काय हरकत होती? जे अतिक्रमण धारक कोर्टात गेलेले आहेत ते सोडून गडावरील सर्व बांधकामे जमीनदोस्त करावीत. मलिकल ए रेहानच्या थडग्यावर जो तीन मजली बेकायदेशीर दर्गा बांधण्यात आला आहे तो दर्गा थडगे सोडून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा बेकायदेशीर दर्गा ज्या पद्धतीने बुलडोझर लावून उध्वस्त केला त्याच पद्धतीने विशाळगडावरील दर्गा देखील जमीनदोस्त करण्यात यावा, अशा मागण्या नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केल्या.

हे ही वाचा:

मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?

‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

आसाममध्ये ५० लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल हा दावा ठरला फोल

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रसाद रिसवडे, मनोज साळुंखे, प्रकाश निकम, सचिन देसाई, शुभम चव्हाण, अवधूत जाधव, राम काळे, रवि वादवणे, सोमनाथ गोठखिंडे, भूषण गुरव, प्रकाश चव्हाण, दर्शन शिखरे आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा