खोदकामादरम्यान संभलमधील पायरीच्या विहिरीचा दिसला दुसरा मजला!

गेल्या आठवड्यात, १२ ते १५ फूट खोदल्यानंतर, विहिरीचा पहिला मजला दिसला होता

खोदकामादरम्यान संभलमधील पायरीच्या विहिरीचा दिसला दुसरा मजला!

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पायरीच्या विहिरीचे (स्टेप वेल) खोदकाम सुरू असून आता खोदकाम करताना पायरीच्या दुसऱ्या मजल्याचा दरवाजाही नजरेस पडू लागला आहे. सध्या येथील साफसफाई करून आणि डेब्रिज हटवून तेथे पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी उत्खननादरम्यान, विहिरीचा पहिला मजला उघडकीस आला होता, ज्यामध्ये पायऱ्या दिसत होत्या. त्यामुळे चांदौसी परिसरात असलेली ही पायऱ्यांची विहीर किती मजली आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही लोक ही विहीर तीन मजली असल्याचा दावा करत आहेत. मात्र, खोदकाम आणि डेब्रिज हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच याची सत्यता समोर येईल.

माहितीनुसार, सध्या पायरीच्या विहिरीतील मलबा हटवण्याचे काम मजूर हाताने आणि जेसीबीच्या सहाय्याने करत आहेत. गेल्या आठवड्यात, १२ ते १५ फूट खोदल्यानंतर, विहिरीचा पहिला मजला दिसला होता. त्यानंतर विहिरीचा दुसरा मजला उघडकीस आला आहे. चांदौसीची पायरीची विहीर अनेक दशकांपासून माती आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. दरम्यान, आता प्राचीन दगडी बांधकामे आणि बोगद्यासारखे मार्ग सापडले आहेत. काही पायऱ्याही दिसल्या असून यातून विहिरीत खाली उतरता येते.

हेही वाचा..

अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण

भ्रष्टाचार के तीस मार खान; दिल्लीत भाजपाकडून आपविरोधात बॅनरबाजी

येमेनकडून केरळच्या नर्सला फाशीची शिक्षा; सुटकेसाठी भारत सरकार मदत करणार

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सापडले ४४ वर्षांपासून बंद असलेले शिव मंदिर!

सोमवारी खोदकामाच्या दरम्यान पायरीचा दुसरा मजला सापडला तेव्हा एका व्यक्तीने आत जाऊन शंख फुंकला. त्याचबरोबर या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्टेपवेल कॉम्प्लेक्समध्ये बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. एएसआयचे पथकही या विहिरीच्या तपासात गुंतले असून ही पायरी तीनशे वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मणगंज या मुस्लीमबहुल वस्तीत सापडलेल्या पायरीच्या विहिरीत ११ व्या दिवशीही खोदकाम सुरू आहे. स्टेपवेलच्या दुसऱ्या मजल्यावरील कॉरिडॉरमधील माती काढण्याचे काम सुरू आहे. या विहिरीचा वापर पूर्वी पाण्याचा स्त्रोतासाठी आणि सैनिकांच्या विश्रांतीसाठी केला जात होता, असे सांगितले जात आहे.

Exit mobile version