29 C
Mumbai
Tuesday, December 3, 2024
घरधर्म संस्कृतीदुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ – देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा

दुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ – देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा

Google News Follow

Related

दधानां करपद्माभ्याम् अक्षमाला कमंडलु।
देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥

नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित आहे आणि या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. दुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ या नावाने ओळखले जाते.

शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस हा देवी ‘ब्रह्मचारिणी’ला समर्पित आहे. मातेचे हे रूप तपस्विनीचे आहे. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि आचरिणी अर्थात आचरण करणारी. तपस्येचे, ब्रम्हाचे आचरण करणारी ती ब्रह्मचारिणी. तपश्चारिणी, उमा ही देखील या रुपाची नावे आहेत. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले.

पौराणिक कथेनुसार, हिमालय कन्या म्हणून जन्म घेतल्यानंतर नारदमुनींने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली. यानुसार तिने कठोर तपश्चर्या केली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता अनेक वर्षे केवळ फळे आणि मुळे खाऊन उपासना केली. कालांतराने तर बेलाची जमिनीवर पडलेली पाने खाऊन उपजीविका केली. शेवटी तर पाने देखील खाणे सोडले म्हणून तिचे नाव झाले ‘अपर्णा’. तिची ही तपस्या पाहून सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला सांगितले, की “हे देवी; आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पत‍ी रूपात प्राप्त होतील,” असा वर त्यांनी दिला.

हेही वाचा..

अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण : पीडितेचा पुतळा बसवण्यावरून वाद

नसरल्लाच्या मुलीनंतर इस्रायलने जावयालाही उडवले!

हे दुर्गेचे रूप शांत आणि भव्य आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, उजव्या हातात जपमाला डाव्या हातात कमंडलू असे तिचे स्वरूप आहे. तप करीत असल्यामुळे तिची वृत्ती स्थिर आहे. त्यामुळे हिचे कोणतेही विशिष्ट वाहन नसून हातात कोणतेही अस्त्र किंवा शस्त्र नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
205,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा