सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेवच ।
दधाना हस्त पद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तुमे ।।
नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे देवी ‘कुष्मांडा’चा दिवस. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘चंद्रघंटा’ रुपाला पूजले जाते आणि चौथा दिवस असतो ‘कुष्मांडा’ देवीचा.
कुष्मांडा देवीला आदिमाया- आदिशक्ती मानले जाते. कुसुम फुलांप्रमाणे हास्य आणि अण्ड-ब्रम्हांड या दोन शब्दांची संधी होऊन कुष्मांडा हा शब्द तयार झाला आहे. ही देवी अष्टभुजा असून सृष्टी निर्मिती पूर्वी जेव्हा चारी दिशांना फक्त अंधार अंधारच होता तेव्हा आपल्या दैवी ईश्वरी हास्यातून अण्ड म्हणजेच ब्रम्हांडाची निर्मिती केली म्हणून तिला ‘आदिशक्ती’ म्हणतात.
कथांनुसार, कुष्मांडा देवीने आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते. सृष्टीच्या चारी बाजूला आंधार पसरलेला होता. सृष्टीचे अस्तित्वही नव्हते. त्यावेळी देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. कुष्मांडा देवीचा निवास हा सूर्य मंडलाच्या आतमध्ये आहे. सूर्याकडे क्षणभरही आपण पाहू शकत नाही. त्या सूर्यमंडलाच्या आतील भागात ही देवी राहते. त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल. या देवीमुळे सर्व दिशा उजळून निघतात.
हे ही वाचा..
जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी गांधीवाद स्वीकारला; यासीन मलिकचा दावा
काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी शेतकऱ्यांना गरीब करण्यात कोणतीही कसर सोडली नाही
हरियाणा, जम्मू-काश्मीरचे आज एक्झिट पोल
उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार
कुष्मांडा देवी अष्टभूजा आहे. या अष्टभूजांमध्ये बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू धारण केले आहे. तर दुसऱ्या भूजामध्ये सिद्धि आणि निधिया युक्त माळा आहे. या देवीचे वाहन सिंह आहे.