नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे देवी ‘स्कंदमाते’चा दिवस. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना मनोभावे केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘चंद्रघंटा’ रुपाला पूजले जाते. चौथा दिवस असतो ‘कुष्मांडा’ देवीचा आणि पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ देवीला पूजले जाते.
दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप हे प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही म्हणतात. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला ‘स्कंदमाता’ म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार, एकदा तारकासुर नावाच्या एका राक्षसाने भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि अमर होण्याचे वरदान मागितले. परंतु, भगवान ब्रह्मदेवाने मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही असे सांगून वरदान देण्यास नाकारले. तारकासुरने हुशार खेळी करून भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मुलाकडे मृत्यू मागितला कारण त्याला असे वाटले की भगवान शिव सर्व गोष्टींपासून अलिप्त आहेत, तपस्या करत आहेत ते कधीही विवाह करणार नाहीत. भगवान ब्रह्मदेवाने त्यांना इच्छित वरदान दिले. यानंतर तारकासुर राक्षसाने आपण अमर आहोत असं समजून सृष्टीचा नाश करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा :
‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!
बापरे! महिलेच्या पोटातून निघाला २ किलोचा ‘केसांचा गोळा’
भोपाळमधून १,८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक!
सार्वजनिक आक्रोशानंतर मोस्ताकीनला अटक
याला कंटाळून सर्व देवता भगवान विष्णू यांच्याकडे मदतीसाठी गेले तेव्हा भगवान यांनी सांगितले की, देवी सतीचा अवतार ‘पार्वती’ ही राजा हिमालयाची कन्या असून तिचा भगवान शंकर यांच्याशी विवाह करायचा आहे. त्यानंतर भगवान शंकरांचा देवी पार्वतीशी विवाह झाला आणि भगवान कार्तिकेयचा जन्म झाला. दैत्यांशी लढण्याचे त्यांचे महान कौशल्य आणि सामर्थ्य पाहून भगवान ब्रह्मदेव यांनी कार्तिकेय यांना देवांचा सेनापती म्हणून नियुक्त केले. पुढे कार्तिकयने तारकासुर राक्षसाचा वध केला. तेव्हापासून पावती माता स्कंदमाता या नावाने ओळखली जाते कारण कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही म्हणतात.
स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय हे मातेसोबत आहेत. देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. तर एक हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहे. देवीचे वाहन सिंह आहे.