दुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’ – कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी

दुर्गेचे सहावे रूप ‘कात्यायनी’ – कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी॥

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. यातील दुर्गा देवीचे सहावे रूप म्हणजे ‘कात्यायनी’. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘चंद्रघंटा’ रुपाला पूजले जाते. चौथा दिवस असतो ‘कुष्मांडा’ देवीचा. पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ देवीला पूजले जाते आणि सहावे रूप म्हणजे ‘कात्यायनी’.

पौराणिक कथेनुसार, कत नावचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचे पुत्र ऋषि कात्य असे त्यांचे नाव होते. याच कात्य ऋषिंच्या गोत्रात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. त्यांनी भगवती पराम्बा हिची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. आई भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला. काही काळानंतर जेव्हा महिषासुर नावाचा असूर पृथ्वीवर अत्याचार करू लागला, तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपल्या शक्तीचा अंश एकवटून देवीला आवाहन केले. महर्षी कात्यायनांनी त्यांची सर्वप्रथम पूजा केली आणि त्यांचीच देवीला ओळख मिळाली आणि ती ‘कात्यायनी’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

हे ही वाचा..

मायक्रो आरएनएच्या शोधासाठी अमेरिकेचे व्हिक्टर ऍम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार

मालदीवसाठी भारत सर्वात मोठे पर्यटन स्रोत

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, आरोपींवर १० लाखांचं बक्षीस!

कात्यायनी देवीला चार भुजा आहेत. एका हाताने देवी आशीर्वाद देत आहे, तर दुसऱ्या हाताने अभय देत आहे. तिसऱ्या हातात तलवार आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे. देवी कात्यायनी सिंहासनावर आरूढ झालेली आहे.

Exit mobile version