दुर्गेचे आठवे रूप ‘महागौरी’ – महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा

दुर्गेचे आठवे रूप ‘महागौरी’ – महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा

श्वेत वृषे समारूढ़ा श्वेताम्बर धरा शुचिः।

महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा ॥

नवरात्रीचे नऊ दुर्गेच्या नऊ रूपांना पूजले जाते. दुर्गा देवीचे आठवे रूप म्हणजे ‘महागौरी’ . नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा केली जाते. तर, दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘ब्रह्मचारिणी’ रुपाची आराधना केली जाते. तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘चंद्रघंटा’ रुपाला पूजले जाते. चौथा दिवस असतो ‘कुष्मांडा’ देवीचा. पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ देवीला पूजले जाते, सहावे रूप म्हणजे ‘कात्यायनी’, सातवे रूप म्हणजे ‘कालरात्री’ आणि आठवे रूप म्हणजे महागौरी.

आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी ‘महागौरी’ देवी आहे. देवीच्या या स्वरुपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असेही म्हटले जाते.

पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीच्या रूपात महागौरीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. एकदा भगवान भोलेनाथांच्या एका शब्दाने पार्वतीजींचे मन दुखावले जाते आणि देवी पार्वती तपश्चर्येत गढून जातात. अशा प्रकारे वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करूनही देवी पार्वती येत नाहीत, तेव्हा भगवान शिव पार्वतीच्या शोधात देवीपर्यंत पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर देवी पार्वतीला पाहून त्यांना आश्चर्य वाटते. देवी पार्वतीचा रंग अतिशय तेजस्वी तसेच चंद्रप्रकाशासारखा पांढरा आणि कुंद फुलासारखा पांढरा दिसतो. देवीच्या वस्त्र आणि अलंकारांवर प्रसन्न होऊन महादेव देवी उमाला गौरवर्णाचे वरदान देतात आणि यामुळे देवीला ‘महागौरी’ म्हणतात.

हे ही वाचा : 

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

काँग्रेसचे म्हणजे जिंकता येईना ईव्हीएम वाकडे

धक्कादायक! नौशाद आणि हसन अलीकडून चहात थुंकीचा प्रकार!

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा रेल्वे उलटवण्याचा कट, रुळावर ठेवल्या ‘सिमेंट स्लीपर’

चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल, तर दुसऱ्या हातात डमरू आले. देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे.

Exit mobile version