आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या पौर्णिमेचे हिंदू धर्मात एक विशेष महत्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. तर त्या सोबतच देवी लक्ष्मीचे पती भगवान विष्णू यांचीही उपासना करतात. आपल्या घरावर आणि कुटुंबावर लक्ष्मी देवीची कृपा बनून रहावी आणि घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदावे यासाठी कोजागिरी साजरी करतात.
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी ‘को जागरती’ म्हणजेच ‘कोण जागे आहे’ असे विचारात लक्ष्मी माता पृथ्वीवर वास करते आणि तिच्या भक्तांना आशीर्वाद देते अशी धारणा आहे. तर या दिवशी आकाशातून भूतलावर अमृताचा वर्षाव होतो अशीही एक समजूत हिंदू परंपरेत आहे.
हे ही वाचा:
धर्मांतरविरोधी कायदा करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी
कौतुकास्पद! लसीकरण १ अब्जच्या दिशेने
अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’
गणेश मिरवणुकांना बंदी; ईदच्या मिरवणुकांना हिरवा कंदिल
यंदाच्या वर्षी आज म्हणजेच इंग्रजी दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पौर्णिमा तिथी सुरु होत आहे. संध्याकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी पौर्णिमा सुरु होईल. तर बुधवार, २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून २६ मिनिटांनी ही तिथी संपेल. आजच्या रात्री देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तर चंद्रालाही नैवेद्य दाखवला जातो. आजच्या रात्री मसाला दूध करून कुटुंबीय आणि मित्र मंडळींसोबत त्याचा आस्वाद घेण्याचीही प्रथा आहे. तर काही ठिकाणी संगीत मैफिली आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केलेले पाहायला मिळते.