कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद

कर्नाटकमधील शाळांमध्ये सध्या हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील काही शाळांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे तर काही शाळांमध्ये बजरंग दलाने विद्यार्थीनींना भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे. शाळा- महाविद्यालयांमध्ये जय श्रीरामचे नारेही दिले जात आहेत. उडुपी जिल्ह्याीतल बिंदूर गावातील सरकारी कॉलेजमध्ये ही घटना घडली.

कॉलेजमध्ये हिजाब आणि भगवा स्कार्फ विरुद्धचा वाद होत असताना कॉलेजच्या प्राचार्यांनी हिंदू संघटनांना भगवा स्कार्फ परिधान करण्याची मोहीम मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, हिंदू संघटना अधिकच आक्रमक झाल्याने कर्नाटक सरकारने कर्नाटक एज्युकेशन ऍक्ट १९८३चे कलम १३३ लागू केले आहे. त्यामुळे सर्वांना सारखाच गणवेश परिधान करावा लागणार आहे. खासगी शाळा स्वतःचा गणवेश निवडू शकणार आहेत. या आदेशामुळे हिजाबचा वाद अधिकच वाढला आहे.

भाजप नेते सी टी रवी यांनी प्रम्हटले आहे की, सर्व शाळेत स्कूल युनिफॉर्म अनिवार्य असावा. काँग्रेसने जाणूनबुजून विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

…आणि चीनने पाकिस्तानला एक दमडीही दिली नाही

राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

बुटात लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

स्पुटनिक लाइट सिंगल-डोस लसीला आपत्कालीन वापराची परवानगी

जानेवारी महिन्यात उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, महाविद्यालयाने त्यांना परवानगी दिली नाही असं सांगण्यात आले. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळून वाद सुरू झाला.

विद्यार्थीनी भगवा स्कार्फ घालून येत असून त्यांना पोलीस महाविद्यालयात जाण्यापासून मज्जाव करत आहेत. जर भगवा स्कार्फ घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना महाविद्यालयात प्रवेश मिळत नसेल तर हिजाब घालून येणाऱ्या मुलींनाही महाविद्यालयात प्रवेश देऊ नये, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा सचिव सुरेंद्र कोटेश्वर यांनी केली आहे.

Exit mobile version