ज्ञानवापीमधली शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश

ज्ञानवापीमधली शिवलिंग सापडलेली जागा सील करण्याचे आदेश

गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण सुरू होते. हे सर्वेक्षण मंगळवार, १६ मे रोजी संपले. त्यानंतर बुधवार, १७ मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच विविध पक्षांकडून मोठे दावे केले जात आहेत. हिंदू पक्षानेही मशिदीत सर्वेक्षण करताना १२ फूट ८ इंचाचे शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे.

शिवलिंग मिळण्याच्या दाव्याबाबत हिंदू पक्षाने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे ते ठिकाण तात्काळ सील करावे आणि त्या ठिकाणी प्रवेश बंदी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शिवलिंग शोध हा महत्त्वाचा पुरावा आहे त्यामुळे सीआरपीएफ ने हा परिसर सील करून संरक्षण करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी परिसरात शिवलिंग सापडल्याची माहिती हिंदू बाजूचे वकील हरी शंकर जैन यांनी न्यायालयाला दिल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

नितेश राणेंचा मुंबई पालिका आणि ठाकरे सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर

फडणवीसांनी ठोकले!

होय, मुंबई वेगळी करायची आहे, पण तुमच्या भ्रष्टाचारापासून!

तीन दिवसांच्या कामकाजानंतर सोमवारी या वादग्रस्त बांधकामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या पथकाने सोमवारी नंदीसमोरील बांधकामांचे मुल्यांकन केले आहे. त्यापूर्वी रविवारी पश्चिमेकडील भिंत, नमाज स्थळ, वुझू स्थळ, तळघर आदींचे सर्वेक्षण करण्यात आले. १ हजार ५०० सुरक्षा कर्मचार्‍यांच्या उपस्थित हे सर्वेक्षण करण्यात आले.

Exit mobile version