वीर सावरकर स्मृतिदिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थिनींना परवानगी देणाऱ्या हावेरी जिल्ह्यातील गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेजमधील प्राचार्यांवर शिस्तभंग कारवाईचे निर्देश कर्नाटक शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दिले आहेत. के. कृष्णाप्पा असे या प्राचार्यांचे नाव आहे.
१२ डिसेंबर रोजी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे प्रधान सचिव रितेशकुमार सिंह आणि हवेरी जिल्हा पंचायतीचे सीईओ अक्षयकुमार श्रीधर यांनी कॉलेजला भेट दिली होती. तेव्हा त्यांना कॉलेजमध्ये तुरळक उपस्थिती दिसली. चौकशी केली असता, सुमारे ९५ टक्के विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. हे सर्व विद्यार्थी १७ डिसेंबरला होणाऱ्या वीर सावरकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तालीम करत असल्याचे समजले. याबाबत तीव्र नाराजी दर्शवत प्रधान सचिव रितेश यांनी जिल्हा पंचायतीच्या सीईओंना विस्तृत अहवाल शिक्षण विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले. ‘प्राचार्य के. कृष्णप्पा यांनी महिला विद्यार्थिनींना विभागाद्वारे आयोजित शैक्षणिक कार्यक्रमांच्या बाहेर खासगी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास परवानगी देऊन निष्काळजीपणा दर्शविला,’ असे एका अधिकाऱ्याने या अहवालाचा हवाला देत स्पष्ट केले.
सन २०२१मध्ये, प्रलंबित शिस्तपालन विभागाच्या चौकशीबद्दल खोटी माहिती देऊन के. कृष्णप्पा यांनी प्राचार्यपद मिळवले होते. आता या नव्या आरोपामुळे कृष्णप्पा यांच्या बाबत नवा वाद उद्भवला आहे. प्रत्युत्तरादाखल, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने २९ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांची पदोन्नती रद्द केली, असे विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
२० नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्व पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी कृष्णप्पा यांना बंगळुरू येथील शालेय शिक्षण विभागाकडे अहवाल देण्याचे निर्देश दिले आणि इजारिलकामपुरा महाविद्यालयाचा प्रभार वरिष्ठ व्याख्यात्याकडे सोपवला. कृष्णप्पा यांना १७ डिसेंबरपर्यंत प्राचार्यपदावरून काढून टाकण्यात आले. कृष्णप्पा यांना हटवण्याची वेळ आणि ‘वीर सावरकर संस्कारे’ कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या सहभागाच्या अनुषंगाने, जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. “शैक्षणिक कार्यक्रमांव्यतिरिक्त असणाऱ्या सावरकर कार्यक्रमासाठी पाठवलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आहे,” असे हावेरी डीडीपीयू उमेशप्पा यांनी सांगितले.
तसेच, कृष्णप्पा यांची पदावनती आणि कर्तव्यातून मुक्त होणे याचा सावरकर कार्यक्रमाशी संबंध नाही आणि उच्च अधिकार्यांच्या आदेशानंतर हा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना गैर-शैक्षणिक कार्यक्रमांना पाठवून मुख्याध्यापकांनी नियमांचे उल्लंघन केले; विभागाच्या अधिकार्यांनी आधीच चौकशी सुरू केली आहे आणि अहवाल पाठवला आहे,” असे हावेरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रसन्न हिरेमठ यांनी सांगितले. तर, ‘मुख्याध्यापकांच्या पदावनतीचा सावरकर स्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागाशी संबंध नाही,’ असे सावरकर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राष्ट्रभक्त बाला संघटनचे मानद अध्यक्ष के.ई. कंठेश यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
मराठा समाजाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त
कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना
खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर
‘वीर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक आहेत आणि आम्ही त्यासाठी ६०० हून अधिक शाळकरी मुलांना आमंत्रित केले होते. ज्यांनी त्यांच्या वर्गात अडथळा न आणता भाग घेतला होता,” असे त्यांनी सांगितले. प्राचार्य कृष्णप्पा यांनी मात्र त्यांना तालमीला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल माहिती नव्हती, असे सांगून विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाच्या तासांनंतर तालमीत भाग घेतला, जो दुपारी १२ नंतर संपला, असे स्पष्ट केले.