…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा

…म्हणून गुजरातमधील शहराला मिळाला ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ चा दर्जा

मंगळवार, २७ जुलै रोजी भारतातील आणखीन एका स्थळाचा युनेस्कोच्या ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गुजरातमधील या शहराचे नाव धोलावीरा असे आहे. गुजरात राज्यातील कच्छच्या रणामध्ये हे शहर वसलेले आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीतले हे भारतातले चाळीसावे स्थळ ठरले आहे.

गुजरात मधील धोलावीरा या शहराचा समावेश युनेस्कोच्या हेरिटेज साईटच्या यादीत व्हावा म्हणून भारताकडून २०२० साली जानेवारी महिन्यात नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले होते. त्यालाच अखेर मान्यता देताना युनेस्कोने या शहराचे नाव वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे. २०१४ सालापासून हे स्थळ युनेस्कोच्या हेरिटेज साईटच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट होते. धोलावीरा: हडप्पा शहर हे दक्षिण आशियातील काही मोजक्या चांगल्या संरक्षित शहरी वसाहतींपैकी एक आहे, जे इसवी सन पूर्व  तिसऱ्या ते दुसऱ्या मध्य सहस्त्रकाच्या दरम्यान वसवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री! शपथविधीचाही ठरला मुहूर्त

भास्कर जाधव यांनी पुराचे खापर फोडायला शोधली डोकी

मदत घेऊन निघाले भाजप युवा मोर्चाचे ट्रक…

वर्ल्ड हेरिटेज साईट ठरलेल्या भारतातील मंदिराची काय आहे खासियत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “या बातमीने अत्यंत आनंद झाला. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते आणि हे आपल्या भूतकाळाशी संबंधित असलेला सर्वात महत्वाचा दुवा आहे. विशेषत: इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणार्‍यांसाठी हे नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ आहे.”

दोन दिवसांपूर्वीच तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड ‘हेरिटेज साईट्स’ च्या यादीत करण्यात आला. रामप्पा नावाने प्रसिद्ध असणारे काकतीय रुद्रेश्वर मंदिर हे युनेस्कोच्या यादीतील भारतातले ३९ वे स्थळ ठरले होते. त्यानंतर दोन दिवसांतच धोलावीरा शहराचा समावेश युनेस्कोच्या यादीत करण्यात आला आहे.

Exit mobile version