वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटले जाते. प्रामुख्याने घराघरात दिवाळीचा खरा उत्साह हा याच दिवशी दिसून येतो. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे.
या दिवशी वस्त्रे आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ मानले जाते. घरातील तिजोरीतून अलंकार काढून ते स्वच्छ केले जातात. याच दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हे आणखी एक व्रत करण्यात येते. धन्वंतरी सर्व वेदात, मंत्र- तंत्रात निष्णात होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने नाना औषधींचे सार अमृतरूपाने देवांना प्राप्त झाले. त्यामुळे त्यांना ‘देवांचे वैद्यराज’ हे पद मिळाले.
हे ही वाचा:
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल
राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?
या दिवशी धन देवता, देवी लक्ष्मी, कोषाध्यक्ष भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधीवत पूजा केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही. पौराणिक कथेनुसार भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे, कारण जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात कलश होता.
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याच्या वस्तू, उपकरणं, दागिने खरेदीसाठी हा शुभमुहूर्त मानला जातो. धनत्रयोदशी हिंदू धर्मातील सोने खरेदीचा पवित्र दिवस असल्याने बहुतेक जण या शुभमुहूर्तावर सोने आणि दागिन्यांची खरेदी करतात.