धनत्रयोदशी: आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारी देवता धन्वंतरी

धनत्रयोदशी: आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारी देवता धन्वंतरी

राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह असून आज धनत्रयोदशी आहे. आश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. हा दिवस दिवाळी सुरु होण्यापूर्वी असतो.

पौराणिक कथेनुसार, धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अवतार असून समुद्रमंथनाच्या वेळी ते अमृताचा घागर घेऊन समुद्रातून बाहेर पडले होते. धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते. यामुळे आरोग्य, औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते. प्राचीन काळात वैद्यकशास्त्र, आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते.

पुराणात असे म्हटले जाते की, समुद्रमंथनाच्या वेळी अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले. धन्वतंरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान होते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे.

हे ही वाचा : 

केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, १५० हून अधिक जखमी

MUDA मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कर्नाटकमध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी

पोलिसांनी कारवाई करताच केली मारहाण

शरद पवारांची चौथी यादी; अनिल देशमुखांऐवजी त्यांच्या मुलाला उमेदवारी

दिवाळीत धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळविण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्रमंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता, म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.

Exit mobile version