मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार; मलई गरिबांना वाटणार

देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वस्त

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार; मलई गरिबांना वाटणार

देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील जांबोरी मैदान येथे झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात केली. यावेळी वरळीत भाजपाने या मैदानावर दहीहंडीचे आयोजन करून शिवसेनेच्या हातून ती संधी हिरावून घेतली. एरवी सचिन अहीर हे मूळचे राष्ट्रवादीचे पण नंतर शिवसेनेत आलेले आमदार या मैदानावर दहीहंडीचे आयोजन करत असत मात्र मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी यावेळी दहीहंडीचे आयोजन केले होते.

तब्बल दोन वर्षांनी दहीहंडीचा उत्साह याठिकाणी पाहायला मिळाला. मुंबई, ठाणे अशा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दहीहंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला युवक युवतींचाही मोठा प्रतिसाद लाभला. जांबोरी मैदानातही अनेक पथके दहीहंडी फोडण्यासाठी सरसावली होती. त्यांना आश्वस्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये उत्साह आहे. देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही भ्रष्टाचाराची हंडी फोडतो आहोत. मुंबईतल्या महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडीही आम्ही फोडणार आहोत आणि त्यातील मलई गरीबांना वाटणार आहोत.

हे ही वाचा:

आता महाराष्ट्रात सीबीआयला दरवाजे खुले?

समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज

लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा

सिसोदियांच्या घरी सीबीआय

 

हा मतदारसंघ वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आहे. याच भागात आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सचिन अहीर, सुनील शिंदे हेदेखील दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यादेखील याच भागातल्या. शिवाय, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत आहेत. असे असतानाही सध्या शिवसेनेतर्फे जी प्रतिज्ञापत्रे गोळा करण्यात येत आहेत. त्यात वरळीतून कमी प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, घाटकोपर येथेही देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. भाजपा नेते राम कदम यांनी आयोजित केलेल्या या उत्सवात अनेक पथकांनी आपले कौशल्य दाखविले. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, आमचं सरकार आल्यावर सगळं मोकळं होतं. गणेशोत्सव जोरात, दहीहंडी जोरात, नवरात्रौत्सवही जोरात होणार.

Exit mobile version