विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद पंड्या यांचे निधन झाले आहे. ते एक सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत होते. हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या विचारांनी प्रभावित झालेले पंड्या यांच्या निधनाने समाजात कधीही न बहरून निघणारी पोकळी निर्माण झालीय आहे. तर एक राष्ट्रीय विचारवंत गेल्याची भावना समाजातून व्यक्त होताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आनंद शंकर पंड्याजी बहुप्रसव लेखक आणि विचारवंत होते.इतिहास,सार्वजनिक धोरण आणि आध्यात्मिक विषयांवर त्यांनी व्यापक लेखन केले. भारताच्या विकासाबाबत त्यांना आस्था होती. विहिप मध्ये सक्रीय असणारे पंड्या यांनी समाजाची निःस्वार्थ सेवा केली. त्यांच्या निधनाने दुःख झाले.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार
वक्फ बोर्डाशी संबंधितांवर छापेमारी होताच मलिकांचा मंदिर घोटाळ्याचा आरोप
‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’
आज पासून सुरु होणार आरबीआयच्या दोन नव्या योजना, ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा
आनंद शंकर पंड्याजी यांच्या समवेत मागच्या काळात केलेले संवाद मला स्मरतात. थोर स्वातंत्र्य सैनिकांसमवेत त्यांनी साधलेला संवाद आणि विविध मुद्यांबाबत आशयघन विचार त्यांच्याकडून ऐकणे ही पर्वणी होती. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून शोक व्यक्त केला.ओम शांती ! असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले.