28 C
Mumbai
Sunday, October 6, 2024
घरधर्म संस्कृतीदेवगिरी किल्ला परिसरातील भारतमातेच्या दर्शनाला बंदी नाही

देवगिरी किल्ला परिसरातील भारतमातेच्या दर्शनाला बंदी नाही

Google News Follow

Related

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ला येथे असलेल्या भारतमाता मंदिरात दर्शनाला कोणतीही बंदी नाही, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अन्वये याबाबतची सूचना मांडली होती.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, यासंदर्भात मी २० जून रोजी प्रधानमंत्री यांना पत्र लिहून अशी घटना होऊ नये, अशी विनंती केली. पुरातत्व विभागाने अशी कोणतीही बंदी नाही असे पत्राद्वारे कळविले आहे. तेथे पूजाअर्चा सुरू असून भारतमाता मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री जनार्दन स्वामी मंदिर येथील पर्यटकांसाठी तसेच भाविकांच्या दर्शनासाठी कोणताही प्रतिबंध केलेला नाही. याठिकाणी एकादशी, आषाढी एकादशी, कामिका एकादशी, जनार्दन स्वामी यांची पुण्यतिथी याप्रसंगी येणाऱ्या भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने विनाशुल्क प्रवेश सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

हे ही वाचा:

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!

तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या

प्रत्येक दुर्ग किल्ल्यांच्या परिसरात विविध देऊळे आहेत, तेथे स्वच्छता राखण्याबाबत, दिवाबत्ती करण्याबाबत कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने केली. त्यावर राज्याच्या अखत्यारीतील स्थळांमध्ये अशी व्यवस्था निश्चित करण्यात येईल, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा