सतीच्या शरीराचे अवयव, वस्त्र किंवा दागिने जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठे अस्तित्वात आली, असं मानलं जात. ही शक्तिपीठे भारतात तर आहेतच पण भारताच्या शेजारील देशांमध्येही आहेत. छत्तीसगडमध्ये असेच एक शक्तीपीठ आहे. दंतेश्वरी मंदिर या नावाने हे ओळखले जाते.
दंतेश्वरी मंदिर हे दंतेश्वरी देवीला समर्पित आहे. हे मंदिर छत्तीसगडमधील दंतेवाडा शहरात आहे. दंतेवाडा शहराचे नाव दंतेश्वरी देवीच्या नावावरून पडले आहे, अशी माहिती आहे.
सतीचे दात या ठिकाणी पडले होते, अशी आख्यायिका आहे. येथे देवी सतीची माँ दंतेश्वरी आणि भगवान शंकराची कपालभैरव म्हणून पूजा केली जाते. काळ्या दगडात कोरलेली देवीची प्रतिमा असून त्या मूर्तीची भाविकांकडून पूजा केली जाते. दरवर्षी दसऱ्याच्या वेळी आजूबाजूच्या गावांमधून आणि वन्य भागातून हजारो आदिवासी भाविक तसेच देशभरातून भाविक देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात.
चालुक्यांनी १४ व्या शतकात या मंदिराचे बांधकाम केले आहे. गर्भगृह, महामंडप, मुखमंडप आणि सभा मंडप अशा चार भागात मंदिराची विभागणी करण्यात आली आहे. गर्भगृह आणि महामंडप दगडी तुकड्यांनी बांधण्यात आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गरुडस्तंभ आहे.
हे ही वाचा
सी- लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू
दुसऱ्या महायुद्धाच्या ८३ वर्षांनंतर पोलंडची जर्मनीकडे १.३ ट्रिलियन डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी
२४ वर्षांनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मागणाऱ्या तरुणीला फटकारले
दुर्दैवी!! गरबा खेळताना मुलगा गेला पाठोपाठ वडीलही मृत्युमुखी
सत्ययुगात दक्ष राजाने यज्ञ केला तेव्हा त्याने भगवान शंकरांना निमंत्रित केले नाही, असं म्हटलं जातं. याचा राग मानून सतीने त्या यज्ञात उडी घेतली. याबद्दल शंकर भगवान यांना समजताच त्यांनी सतीला उचलले आणि जगाची परिक्रमा करू लागले. शंकराचा राग पाहता विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र चालवले त्यामुळे सतीचे अवयव, दागिने विखुरले गेले आणि ते जागोजागी पडले. तसेच या ठिकाणी सतीचा दात पडला, अशी कथा सांगितली जाते.