क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितली, धर्मांतर, मैदानावर नमाज, पाकिस्तानमधील हिदूंची दुरवस्था

दानिश कनेरियाने उघड केल्या पाकिस्तानच्या कुरापती

क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितली, धर्मांतर, मैदानावर नमाज, पाकिस्तानमधील हिदूंची दुरवस्था

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने मैदानावर नमाज अदा करणे, धर्मांतर आणि पाकिस्तानमधील हिंदूंची दुरवस्था या मुद्द्यांवर उघडपणे चर्चा केली. तसेच, त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेली बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ४२ वर्षीय दानिश यांना हिंदू असल्यामुळे स्वतःच्याच देशात खूप खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले आहे, याची त्यांनी कबुली दिली.

 

भारतीय संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने अनेकदा दानिशला धर्मांतर करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दानिशने त्याचा धर्म बदलला नाही, असे दानिश यांनी सांगितले. ‘मला माझा संघ किंवा पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही. मी त्यांचे विक्रम नाही ना मोडणार, ही भीती त्यांना सतावत होती.

 

 

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोणतीही हिंदू व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान झालेली नाही. मात्र भारतात असे नाही. भारतात सर्व धर्मांच्या व्यक्ती खेळतात. त्यांनी माझी अवस्था अतिशय वाईट करून टाकली होती. पण माझा देवावर विश्वास होता. शार्जिल खान याने सामना फिक्स केला, अन्य खेळाडूंनीही तसेच केले. सर्वांना परत बोलावण्यात आले, पण माझ्याबाबत हे काहीच झाले नाही,’ असे दानिश यांनी एका मुलाखतीत सांगितले.

हे ही वाचा:

अमेरिकेत बंदुकधाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात २२ ठार

शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबियांना शिंदे सरकारकडून मदत जाहीर

जितेंद्र आव्हाडांचे ड्रग्स तस्करांशी संबंध?

NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

सकाळच्या नमाजसाठी फोन येत असे

‘इंजमाम उल हकच्या नेतृत्वाखाली मी बराच खेळलो. मला सकाळच्या नमाजसाठी फोन येत असे. पण मी नकार देत असे. इंजमामनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. मला संघातून काढून टाकण्याचा प्रयत्न होत असे,’ असेही दानिशने सांगितले. मैदानात नमाज अदा करण्यावरही त्यांनी टीका केली. तुम्ही नमाज ड्रेसिंग रूम किंवा स्वतंत्र खोलीत अदा करा. मैदान ही त्यासाठीची जागा नाही. आपण मैदानात पूजा करतो का? पाकिस्तानी नागरिक जय श्री रामाच्या जयघोषाला विरोध करतात. मात्र भारतीय नागरिक असा जयघोष करून तुमचे स्वागत करत आहेत, असेही ते म्हणाले. जर मी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर कर्णधार झालो असतो, असाही दावा त्यांनी केला.

Exit mobile version