गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे अनेक सणांवर निर्बंधांची टांगती तलवार आहे. त्यातच आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला दहीहंडी हा उत्सवही आहेच. ठाकरे सरकारकडून लादलेल्या या निर्बंधामुळे गोविंदा पथकांच्या जोडीने या सणांवर आधारीत असलेल्या व्यवसायांचाही हिरमोड झालेला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या एकीकडे कमी झाले असे राज्य सरकार म्हणत आहे. तर दुसरीकडे तिसरी लाट येणार म्हणून, अनेक सणांवर निर्बंध लादत आहे.
दहीहंडी उत्सवावरील बंदीमुळे कुंभार व्यावसायिकांना चांगलाच फटका बसलेला आहे. मुख्य म्हणजे हा त्यांचा हक्काचा हंगाम बुडीत खात्यात गेलेला आहे. गतवर्षीची मडकी तशीच पडून राहिल्यामुळे नुकसान झालेच होते. त्यामुळे यंदा अनेक व्यावसायिक या वर्षीच्या आशेवर होते. परंतु ७५ टक्के मागणी घसरल्याने आता हाही हंगाम हातून गेल्याचे दुःख अनेक व्यावसायिकांना आहे. कुंभारवाडय़ात यंदाही हजारो मडकी घडवण्यात आली. परंतु मागणीच नसल्याने ती वर्षभर पडून राहणार आहेत. दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारल्याने विशेष फटका बसणार आहे.
हे ही वाचा:
राणेंची अटक आणि मोदींची घोडचूक
धाबे दणाणले; कोरोनाचे कारण देत पालिका निवडणुकाही पुढे ढकलण्याचा घाट?
आयएसआयएस-खुरासानने स्वीकारली काबुल बॉम्ब हल्ल्याची जवाबदारी
खडसे यांची ही संपत्ती केली ईडीने जप्त
दहीहंडी, नवरात्री, दिवाळी, मकरसंक्रांत अशा काही उत्सवांच्या निमित्ताने कुंभारकामाला चालना मिळते. कुंभार व्यावसायिक हे प्रामुख्याने धारावीमध्ये आपल्या वर्षभराच्या उत्पादनातून कमावत असतात. परंतु सणांवर आलेल्या निर्बंधांमुळे मागणीत चांगलीच घट झालेली आहे. वर्षभरातील सणांचे नियोजन खूप आधीपासून हे उत्पादक करतात. यामध्ये मागणी लक्षात घेऊन मातीकामातून दिवे, माठ, मडकी बनवण्याचे काम वर्षभर व्यावसायिक करत असतात. गतवर्षी सुद्धा कोरोनामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आली होती. यंदाही तिच निर्बंधांची परिस्थिती असल्यामुळे मागणीत चांगलीच घट झालेली आहे.