डी गुकेशने घेतले तिरुपतीचे दर्शन; केस देवाला अर्पण करत केले मुंडण

आगामी स्पर्धांसाठी कठोर परिश्रम करत राहणार, असा व्यक्त केला विश्वास

डी गुकेशने घेतले तिरुपतीचे दर्शन; केस देवाला अर्पण करत केले मुंडण

बुद्धिबळपटू डी. गुकेश याने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत जागतिक जगजेतेपद मिळवले. डी गुकेश हे अजिंक्यपद मिळवणारा इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता बनला. यानंतर डी गुकेश याने त्याच्या कुटुंबासह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला मंदिराला भेट दिली. दर्शनानंतर डी गुकेश याने आपले केस देवाला अर्पण करत मुंडण केले.

गेल्या वर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशने डिंग लिरेनला हरवले होते आणि सध्या तो FIDE क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताचा नंबर १ वर आहे. मंदिरात मनोभावे दर्शन घेतल्यानंतर गुकेश याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या विजयानंतर त्यांना मंदिरात यायचे होते. “मला नेहमीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर येथे यायचे होते म्हणून मी खूप आनंदी आहे आणि मला खूप चांगले दर्शन मिळाले,” अशा भावना डी गुकेश याने व्यक्त केल्या. मला कठोर परिश्रम करत राहावे लागतील. २०२५ मध्ये अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आहेत, म्हणून मी त्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मला सर्व फॉरमॅटमध्ये सुधारणा करायची आहे आणि आशा आहे की, देवाच्या कृपेने कधीतरी चांगल्या गोष्टी घडतील, असेही तो म्हणाला.

हेही वाचा..

स्टॅलिनची सटकली, अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह हटवले

१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला आता हिंदू सण आठवले, आदित्य ठाकरेंचा हा खोटारडेपणा!

‘केबीसी’च्या १७ व्या सीझनचे पुन्हा होस्ट असतील अमिताभ बच्चन

टाटा मास्टर्समध्ये डी गुकेश दुसऱ्या क्रमांकावर आला, त्याला टाय-ब्रेकर फेरीत आर. प्रज्ञानंदाकडून पराभव पत्करावा लागला. दरम्यान, टाटा मास्टर्समधील त्याच्या चमकदार कामगिरीमुळे तो क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आणि आता तो मॅग्नस कार्लसन आणि हिकारू नाकामुरा यांच्या मागे आहे. अलीकडेच एका कार्यक्रमात मुलाखत देताना डी गुकेश याने त्याच्या पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणींबद्दलही खुलासा केला होता. पालकांच्या मित्रांनी परदेशात स्पर्धा खेळण्यासाठी प्रायोजित केल्याची आठवण त्याने सांगितली होती. खूप चांगल्या आणि निस्वार्थी लोकांकडून खूप मदत मिळाल्याचे डी गुकेश म्हणाला होता. आता, आमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस आल्याचेही तो म्हणाला होता.

काँग्रेसी ताजे टूलकीट जोडते ‘वक्फ’च्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध... | Dinesh Kanjl | Waqf Board

Exit mobile version