वाराणसीतील ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची सोमवार, २३ मे रोजी जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. मंगळवार, २४ मे रोजी न्यायालय निकाल देणार आहे. जिल्हा न्यालयाने या प्रकरणातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निर्णय राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण वाराणसी न्यायालयाकडे वर्ग केले होते. तसेच आठ आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आज वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू झाल्यावर दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. उद्या दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार असून पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे देखील उद्या सांगण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांवर मेधा सोमय्यांचा १०० कोटींचा दावा
अफगाणिस्तानात महिला टीव्ही अँकरचे ‘चेहरे’ गायब
इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर
जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…
याप्रकरणी मंगळवारी अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. हिंदू पक्षाने न्यायालयाकडे आयोगाचा अहवाल, व्हिडिओ आणि फोटोंची मागणी केली आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करताना १२ फूट ८ इंचाचे शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे ते ठिकाण तात्काळ सील करावे आणि त्या ठिकाणी प्रवेश बंदी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल वाराणसी न्यायालय देईल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.