‘सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील वादग्रस्त पोस्ट हटवा!’

दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश:

‘सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील वादग्रस्त पोस्ट हटवा!’

दिल्ली उच्च न्यायालयाने गूगल, एक्स (माजी ट्विटर) आणि यूट्यूबला निर्देश दिला आहे की, त्यांनी यूट्यूबर श्याम मीरा सिंग यांनी ईशा फाउंडेशनविरोधात पोस्ट केलेले वादग्रस्त व्हिडिओ आणि ट्विट्स त्वरित हटवावेत.

यूट्यूबर श्याम मीरा सिंग यांनी २४ फेब्रुवारी रोजी सद्गुरू (जग्गी वासुदेव) यांच्या आश्रमात काय सुरू आहे?’ या शीर्षकाखाली एक व्हिडिओ आणि काही ट्विट्स पोस्ट केले होते. या पोस्टमुळे ईशा फाउंडेशनची प्रतिमा मलिन होण्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोर्टाचे निर्देश

न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने पुढील निर्देश दिले: गूगल, एक्स आणि यूट्यूब यांनी संबंधित व्हिडिओ हटवावा. श्याम मीरा सिंग यांना हे पोस्ट इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा प्रकाशित करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले, “प्रतिवादी क्रमांक १ ते ३ (गूगल, एक्स, यूट्यूब) यांना हा व्हिडिओ हटवण्याचे निर्देश दिले जातात, तसेच प्रतिवादी क्रमांक  (श्याम मीरा सिंग) यांना हे पुनर्प्रकाशित करण्यास मज्जाव केला जातो.”

ईशा फाउंडेशनचा आरोप: बदनामी करण्याचा कट

ईशा फाउंडेशनच्या वतीने वरिष्ठ वकील माणिक डोगरा आणि अधिवक्ता ध्रुव पांडे यांनी कोर्टात बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, श्याम मीरा सिंग यांचा व्हिडिओ आणि ट्विट्स पूर्णपणे मानहानीकारक, अपमानास्पद आणि आधारहीन आहेत.

या व्हिडिओला यूट्यूबवर ९.५ लाख व्ह्यूज आणि १३.५ हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या होत्या.
फाउंडेशनच्या प्रतिमेला नुकसान करण्यासाठी हा व्हिडिओ महाशिवरात्रीच्या फक्त दोन दिवस आधी अपलोड करण्यात आला. या इव्हेंटमध्ये केंद्रीय गृहमंत्री प्रमुख अतिथी होते, त्यामुळे जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.

हे ही वाचा:

हरियाणामध्ये भाजपाचे ट्रिपल इंजिन सरकार; काँग्रेस हद्दपार!

शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !

जन्म – मृत्यूच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप

संथाल परगण्यात आदिवासी संख्या घटली मुस्लीम संख्या वाढली

३ कोटींच्या भरपाईची मागणी

ईशा फाउंडेशनने आपल्या याचिकेत पुढील मागण्या केल्या: श्याम मीरा सिंग यांचा हेतू गैर-मुद्द्यांना सनसनाटी बनवून त्यांच्या चॅनेलवर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्याचा होता. संस्थेने ३ कोटी रुपयांच्या मानहानी भरपाईची मागणी केली आहे.

‘इतिहास आहे असले आरोप करण्याचा’ – ईशा फाउंडेशनचे वकील

ईशा फाउंडेशनचे वकील माणिक डोगरा यांनी सांगितले, “त्यांनी (श्याम मीरा सिंग) यापूर्वीही काही प्रसिद्ध व्यक्तींविरोधात अशा प्रकारचे दुष्प्रचार केले आहेत.”

Exit mobile version